दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ नोव्हेंबर २०२१: ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र ते वरुण गांधी भाजप सोडणार?

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 22, 2021 | 20:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 22 November 2021 ।Headlines of the 22 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 22 November 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २२ नोव्हेंबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करणार
  • सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले.
  • पाकिस्तानचे एफ-१६ पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र

Whole Day Top 5 News 22 November 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 22 November 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.  आजची पहिली बातमी ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आल्याची आहे. आजची दुसरी बातमी परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात हजर होणार असल्याची आहे. आजची तिसरी बातमी न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने केलेल्या विधानामुळे क्रिडा विश्वात खळबळ माजल्याची आहे. आजची चौथी बातमी आरबीआय पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन होण्याची शक्यता आहे. आजची पाचवी बातमी भाजप खासदार वरुण गांधी भाजपला रामराम देण्याची शक्यता आहे. 

  1. पाकिस्तानचे एफ-१६ पाडणाऱ्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र : विंग कमांडर म्हणून कार्यरत असताना २७ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडण्याची कामगिरी करणाऱ्या आणि आता बढती मिळालेल्या ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र देऊन सन्मानीत करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवन येथे झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांना वीर चक्र देण्यात आले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. परमबीर सिंह ४८ तासांत सर्वोच्च न्यायालयात हजर होणार : महाराष्ट्रात माझ्या जिवाला धोका आहे. यामुळेच मी लपून बसलो आहे. पण भारताबाहेर नाही. अटकेपासून संरक्षण दिले तर सर्वोच्च न्यायालयात हजर होईन, अशी ग्वाही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वकिलाच्या माध्यमातून दिली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण देऊन सर्वोच्च न्यायालयात ४८ तासांत हजर होण्यास सांगितले. तसेच तपासाला पूर्ण सहकार्य करा, असा आदेश दिला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. India vs New zealand : भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत घेतला बदला, रोहितच्या विधानाने खळबळ : भारताने(india) न्यूझीलंडविरुद्धच्या(new zealand) तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात(t-20 match) ३-०ने विजय मिळवत न्यूझीलंडचा सुपडाच साफ केला. न्यूझीलंड तोच संघ आहे ज्यांनी गेल्या महिन्यात भारताला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत(t-20 world cup) ८ विकेटनी हरवत भारताला स्पर्धेतून बाहेर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता भारताने आपल्याच घरात न्यूझीलंडला क्लीनस्वीप केले. सोबतच टी-२० वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेतला. दरम्यान, विजयानंतर रोहितच्या(rohit sharma) विधानाने खळबळ माजली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. पीएमसी बँक युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत विलीन करणार: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत (यूएसएफबी) विलीन करण्याची योजना रिझर्व्ह बँकेने जाहीर केली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भाजप खासदार वरुण गांधी सोडणार कमळाची साथ अन् तृणमूल काँग्रेसच्यासोबत जाणार? : पक्षनेतृत्वावर नाराज असलेले खासदार वरुण गांधी (MP Varun Gandhi) भाजपला (BJP) रामराम ठोकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. वरुण गांधी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी आजपासून दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी