दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ ऑक्टोबर २०२१: शाहरुख खानकडे वानखेडेंची ८ कोटींची मागणी ते रजनीकांत यांना फाळके पुरस्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 24, 2021 | 20:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 24 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 24 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २४ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज जम्मू-काश्मीरमध्ये 12 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे.
  • समीर वानखेडे यांना या प्रकरणात 8 कोटी रुपये मिळणार होते.
  • काही ठिकाणी पेपर कमी पडले तर काही ठिकाणी परीक्षा वेळेवर सुरू झाली नाही.

नवी दिल्ली : Headlines of the 24 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणात वसुलीचे बाब समोर आल्याची आहे. आजची दुसरी बातमी आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळासंदर्भातील आहे. आजची तिसरी बातमी नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या कारवाईची आहे. आजची चौथी बातमी अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याची आहे. आजची पाचवी बातमी अभिनेता रजनीकांत यांना फाळके पुरस्कार मिळणार असल्याची आहे. 

  1. पैशांकरिताच आर्यन खानची अटक? 'शाहरुखकडे 25 कोटींची मागणी, वानखेडेंना मिळणार होते 8 कोटी!' बॉडिगार्डचा धक्कादायक गौप्यस्फोट : सध्या देशात चर्चेत असलेल्या क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे.  आर्यन खान ड्रग्स केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईल यांनी केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Department of Health परीक्षेदरम्यान पुन्हा गोंधळ, कुठे पेपर पडले कमी तर कुठे बदलले परीक्षा केंद्र : आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपतना दिसत नाहीये. आरोग्य विभागाच्या (Health Department) परीक्षेत आज परत गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि नाशिक (Nashik) येथील केंद्रावर घोळ झाला असून परीक्षार्थी (Examiner) उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं पैशांचं घबाड; आयकर विभागाने जप्त केली २५ कोटी : नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने  मागील दोन दिवसांपासून  १० ते १५ कांदा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची झडती घेतली. आयकर विभागाने या झडतीत तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. अद्याप तपास अजून चालू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आयकर चुकवलेल्या व्यापऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Amit Shah in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे, आता तीन कुटुंबाची दादागिरी चालणार नाही - अमित शाह : केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर प्रथमच जम्मूमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होत आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री शाह यांनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये विकास सुरू झाला आहे. जम्मू-काश्मीरवाल्यांसह होत असलेला अन्याय संपण्याची वेळ आली आहे. आता तुमच्यावर कोणी अन्याय करू शकत नाही. आता जम्मू-काश्मीरमध्ये विकास होईल आणि हे राज्य देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देईल. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. रजनीकांतला फाळके पुरस्कार, सोमवारी होणार सोहळा : सिनेसृष्टीतील योगदानासाठी दिला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार उद्या (सोमवार २५ ऑक्टोबर २०२१) दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांतून लोकप्रिय झालेला अभिनेता रजनीकांत याला दिला जाणार आहे. चाहते रजनीकांतला थलायवा या नावानेही ओळखतात. त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी