दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑक्टोबर २०२१: वानखेडेंच्या कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया ते पत्रकार परिषदेत विराट कोहली भडकला

Headlines of the 25 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 25 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद
  • मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत.
  • बजरंग दलाच्या लोकांनी सेटवर ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी देओल मुर्दाबाद’ आणि ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या.

नवी दिल्ली : Headlines of the 25 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी समीर वानखेडेंवर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेची आहे. आजची दुसरी बातमी समीर वानखेडे यांनी नवाव मलिक यांच्या टीकेला उत्तर दिल्याची आहे. आजची तिसरी बातमी रजनीकांत यांना फाळके पुरस्कार मिळाल्याची आहे. आजची चौथी बातमी आश्रम 3’च्या सेटवर बजरंग दलाने हल्ला केल्याची आहे. आजची पाचवी बातमी पत्रकार परिषदेत विराट कोहली पाकिस्तानी पत्रकारांवर भडकल्याची आहे. 

  1. Aryan Drugs Case: मुंबईतील सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवण्यासाठी सर्व धंदे सुरू-संजय राऊत : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या खुलासानंतर आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण आले आहे. दरम्यान साईल यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळे एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)नेत्यांनी टीका केली आहे. राज्यातील सिनेसृ्ष्टी (Bollywood) हलवयाची आहे, सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Sameer Wankhede: माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण : मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. National film awards 2021: सासराबुवा रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर जावईबापू धनुषला राष्ट्रीय पुरस्कार : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात दिल्लीत पार पडला. यावेळी साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रजनीकांत यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. 22 मार्चला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Ashram 3 : 'बाबाजी' च्या आश्रमवर बजरंग दलाचा हल्ला, आश्रम 3’च्या सेटवर हल्ला, प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर फेकली शाई : अभिनेता बॉबी देओलने (Actor Bobby Deol) अभिनय केलेल्या ‘आश्रम’ (‘Ashram 3’)  वेब सीरीज (Web series) लोकांच्या पसंतीस खूप उतरली आहे. या वेब सीरीजचे दोन्ही सीझन खूप पसंत केले गेले होते. आता प्रकाश झा यांनी या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘आश्रम 3’चे शूटिंग भोपाळमध्ये (Bhopal) सुरू झाले आहे. आज या सीरीजच्या सेटवर (Series set) बजरंग दलाच्या (Bajrang Dal) लोकांनी हल्ला (Attack) केला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. पत्रकार परिषदेत भडकला विराट, म्हणाला वादग्रस्त विधान हवे असेल तर आधीच सांगत जा! : रविवारी झालेल्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) भारत (India) -पाकिस्तानच्या (Pakistan) सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला. पाकिस्तानने 10 गडी राखत भारतीय संघाने दिलेलं आव्हान पार केलं. विश्वचषकाच्या (World Cup) सामन्यात भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले. दरम्यान पाकिस्तानने सामना जिंकल्याचा आनंद तेथील पत्रकारांना इतका झाला की त्यांनी आनंदाच्या भरात कर्णधार (Captain) विराट कोहलीला (Virat Kohli) अर्थहीन प्रश्न विचारला. शेवटी काय विराटने जशाच तसे उत्तर देत पत्रकाराचे तोंडबंद केलं. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी