दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ ऑक्टोबर २०२१: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत ते वानखेडेंची बनावट केसेसमधून वसुली

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 26, 2021 | 21:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Headlines of the 26 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 26 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २६ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडे छापेमारीदरम्यान बॉलिवूड कलाकार, मॉडेल अथवा सेलिब्रेटी मिळाल्यास जबरदस्ती तो ड्रग्ज असल्याचे दाखवून फसवतो अन् केस तयार करतो.
  • सर्व अटकळींना विराम लावताना राहुल द्रविडने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.
  • पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवाननेही शमीला पाठिंबा दिला आहे.

मुंबई :  Headlines of the 26 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची करणारी आहे. आजची दुसरी बातमी राहुल द्रविडने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज केल्याची आहे. आजची तिसरी बातमी बॉलिवूडमधील ९ चित्रपट मुस्लीम देशांमध्ये कधीच प्रदर्शित झालेले नसल्याची आहे. आजची चौथी बातमी पाकिस्तानचा किपर मोहम्मद रिझवानने भारतीय गोलंदाज शमीला पाठिंबा दिल्याची आहे. आजची पाचवी बातमी समीर वानखेडे यांनी बनावट केसेस रचून पैसे वसूल केल्याची आहे. 

  1. बळीराजाची दिवाळी होणार गोड, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 3 हजार 600 कोटींची मदत! : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी (Farmers) त्रस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिके पाण्यात वाहून गेले. उत्पन्न नसल्याने ऐन दिवाळीच्या सणावर बळीराजा हताश झाला आहे. पण आता शेतकऱ्यांची दिवाळी (Diwali) गोड होणारी गूड न्यूज अखेर कृषीमंत्री दादा भुसेंनी (Dadaji Bhuse) दिली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Team india coach:राहुल द्रविडने मुख्य प्रशिक्षकासाठी केला अर्ज, लक्ष्मण बनू शकतो नवा एनसीए प्रमुख : भारतीय क्रिकेट संघाचे पुढील प्रशिक्षक(team india coach) बनत असलेला माजी कर्णधार राहुल(former captain rahul dravid) द्रविडने मंगळवार या पदासाठी अधिकृतपणे अर्ज(application) सादर केला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख द्रविड यांनी अर्ज केल्याने क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Bollywood movies banned : बॉलिवूडच्या या 9 चित्रपटांवर मुस्लीम देशांमध्ये बंदी : बॉलिवूडमध्ये (Bollywood )असे अनेक चित्रपट आहेत ज्यांच्या रिलीजवर सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे. काही अनेक कट्सनंतर प्रदर्शित झाले, तर अनेक चित्रपटांनी कधीच चित्रपटगृहांचा चेहरा पाहिला नाही. काही बॉलिवूड चित्रपटांना परदेशातही बंदी घालण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Mohammad Rizwan Support Shami : पाकिस्तानचा किपर मोहम्मद रिझवानने शमीला पाठिंबा देत पोस्ट केला सुंदर मेसेज: ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 10 विकेटने पराभव झाल्यानंतर, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे शमी सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक बनला आहे, पण संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्या समर्थनासाठी उभा राहिला आणि वरिष्ठ भारतीय वेगवान गोलंदाजाच्या समर्थनासाठी  संदेशांचा वर्षाव सुरूच आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Wankhede- Nawab Malik Dispute : समीर वानखेडेंनी 26 बनावट केसेस रचून पैसे उकाळले?, मलिकांनी दिला पुरावा, म्हणाले 1 हजार कोटींपेक्षा जास्त झाली वसुली : आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्सच्या प्रकरणात (Drugs Cases) अटक केल्यापासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP spokesperson)  नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी