दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २७ ऑक्टोबर २०२१: जलयुक्त शिवार योजनेला क्लीनचीट ते आर्य़न खान अजून जामीनच्या प्रतीक्षेत

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 27, 2021 | 21:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 27 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 27 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २७ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • इराणमधील गॅसोलिन स्टेशनवर सायबर हल्ला झाल्याचा इराणचा आरोप
  • चंदीगढ येथे पत्रकार परिषदेत पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली.
  • नागपूर, बुलडाणा, पालघर, अहमदनगर, सोलापूर, बीड, या सहा जिल्ह्यांमधील जलयुक्त शिवार योजनांचे मुल्यमापन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली :  Headlines of the 27 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला क्लिन चीट मिळाल्याची आहे. आजची दुसरी बातमी मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले असून मार्च काढणार असल्याची आहे. आजची तिसरी बातमी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह नवीन पक्ष काढणार असल्याची आहे. आजची चौथी बातमी इराणमधील सायबर हल्ल्याची आहे. आजची पाचवी बातमी आर्य़न खानच्या जामीन विषयीची आहे. 

  1. Jalyukta Shivar: जलयुक्त शिवार अभियानामुळे भूजल पातळी अन् शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ; जलसंधारण विभागाचा अहवाल ; फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारात (Jalyukt Shivar) भ्रष्टाचारासह (Corruption) अन्य आरोप झाले होते. परंतु या आरोपांवर क्लीनचीट (Clean cheat) मिळाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे पुन्हा आक्रमक, पुणे ते मुंबई लाँग मार्च काढावा लागेल, दिला इशारा : जर आरक्षणाच्या(Reservation) मागण्या पूर्ण होत नसतील तर पुणे ते मुंबई (Pune to Mumbai) लॉंग मार्च काढावा लागेल असा इशारा राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj)यांनी दिला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Captain Amarinder Singh काढणार नवीन पक्ष, सर्व ११७ जागा लढवणार... : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh)यांनी चंदीगढ येथे पत्रकार परिषदेत घोषणा करताना सांगितले की मी नवीन राजकीय पक्ष (new Political party by Amarinder Singh)सुरू करतो आहे. मात्र अद्याप नवीन पक्षाचे नाव ठरलेले नाही. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Iran cyberattack | इराणमध्ये सायबर हल्ल्यामुळे गॅस स्टेशनचे काम ठप्प...अमेरिका आणि इस्त्रायलने केल्याचा आरोप : सायबर हल्ला (cyberattack)झाल्यामुळे सब्सिडीच्या रुपात मिळणाऱ्या गॅसोलिनची विक्री खंडित झाल्याचे इराणकडून (Iran)सांगण्यात आले आहे. यामुळे इराणमधील गॅस स्टेशनवर (gas stations in Iran) लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इराणमध्येदेखील इंधनाचे दर वाढले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. aryan khan bail application in drugs case आर्यनची आजची रात्र जेलमध्येच, जामिनावर गुरुवारी सुनावणी : ड्रग पार्टी केसमधील आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी उद्या (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) होणार आहे. सुनावणी सुरू असल्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम कायम आहे, त्याला आजची रात्र जेलमध्येच काढावी लागेल. आर्यनला ३० ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी झाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी