दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ ऑक्टोबर २०२१: आर्यनला अखेर जामीन ते किरण गोसावीला पोलीस कोठडी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 28, 2021 | 19:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 28 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

 Whole Day Top 5 News 28 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ ऑक्टोबर २०२१:  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर चालत आहे. - रेडकर
  • पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीला चांगली कामगिरी करता आली नाही.
  • आदेश मिळेपर्यंत आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तीन आरोपींचा मुक्काम मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच

नवी दिल्ली :  Headlines of the 28 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी आर्यन खानला जामीन मिळाल्याची आहे. आजची दुसरी बातमी गृहमंत्री वळसे-पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची आहे. आजची तिसरी बातमी क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आजची चौथी बातमी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अपप्रचाराविषयीची आहे. आजची पाचवी बातमी किरण गोसावीच्या अटकेची आहे. 

  1. Aryan Khan Granted Bail आर्यनला जामीन पण आजचा मुक्काम जेलमध्येच! :  ड्रग पार्टी केसमध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींना मुंबईच्या उच्च न्यायालयाने आज (गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१) जामीन दिला. पण न्यायालयाचा आदेश जेल प्रशासनाला आज मिळणार नाही. हा आदेश मिळेपर्यंत आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तीन आरोपींचा मुक्काम मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्येच राहणार आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण : Home Minister  Walse-Patil Corona Positive : राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil ) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. याविषयीची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर (Twitter) अंकाऊटवरुन दिली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. Kranti Redkar's letter to the Chief Minister : शिवाजी महाराजांच्या राज्यातच महिलेच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातेय, क्रांती रेडेकरचं मुख्यमंत्र्यांना पत्र : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) एनसीबी विभागीय संचालक(NCB Divisional Director)  समीर वानखेडे (Sameer Wankhede) सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP spokesperson) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Mohammad shami: शमीविरोधात अपप्रचार पसरवण्यामागे पाकिस्तानचा हात - रिपोर्ट : सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(icc t-20 world cup 2021) पाकिस्तानविरुद्धच्या(pakistan) भारताच्या पराभवानतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीबाबत(mohammad shami) अपप्रचार अभियान सुरू करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रविवारी भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील सामन्यात पाकिस्तानने भारताला १० विकेटनी हरवले होते. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Kiran Gosavi in ​​trouble : किरण गोसावीला अडचणीत, 'एवढ्या' दिवसाची मिळाली पोलीस कोठडी : गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात (Mumbai Cruise Drugs Case) पंच असलेल्या किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावी याला ८ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी