दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ मे २०२१: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावलं ते शेलारांचा हल्लाबोल

लोकल ते ग्लोबल
Updated May 03, 2021 | 18:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 3 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 3 May 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३ मे २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही.
  • पुनावालांनी न मागताच वाय दर्जाची सुरक्षा देण्यामागे केंद्र सरकारचा काय हेतू ?
  • निवडणूक आयोगाचं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार - मद्रास न्यायालय

मुंबई : Headlines of the 3 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी निवडणूक आयोगाची आहे, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. आजची आपली दुसरी बातमी आहे, आयपीएलमध्ये वाढत्या कोरोना संकटाची, कोलकातानंतर चेन्नईच्या संघातील काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजची तिसरी बातमी आहे, एसबीआयने ग्राहकांना दिलेल्या सूचनेची. आजची चौथी बातमी आहे, अदर पुनावाला यांना कोणी धमकी दिली याची विचारणा नाना पटोले यांनी केली आहे. तर आपली  पाचवी बातमी आहे, भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केलेल्या हल्लाबोलची.

  1. माध्यमांना वार्तांकन करण्यापासून थांबवू शकत नाही: सर्वोच्च न्यायालय:  सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जोरदार चपराक लगावली आहे. सुनावणी करत असताना न्यायालय जी मते व्यक्त करतं त्यांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावलं आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. IPL2021: चेन्नई सुपरकिंग्सचे तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, खेळाडू मात्र निगेटिव्ह :  देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाने आता आयपीएलच्या मैदानात प्रवेश केला आहे. कोलकाता नाइटरायडर्सच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने आजचा सामना रद्द करण्यात आला. त्यातच आता सीएसकेच्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. स्टेट बॅंकेत खाते असेल तर पटकन करा ही कामे, नाहीतर ३१ मेनंतर खात्यातून काढता येणार नाहीत पैसे : जर तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (SBI) खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना केवायसी (KYC)माहिती अपडेट करणे अनिवार्य केले आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा !: नाना पटोले : कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची यांची औकातच नाही, शेलारांचा सेनेवर हल्लाबोल : जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा सनसनाटी टोला लगावत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी