दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ ऑक्टोबर २०२१: पोप फ्रान्सिस भारत भेटीला येणार ते रामदास आठवलेंची वानखेडे प्रकरणात एन्ट्री

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 31, 2021 | 22:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whole Day Top 5 News 31 October 2021 ।  Headlines of the 30 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 31 October 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ३१ ऑक्टोबर २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भुजबळांना अटक का झाली, पंढरपूरला तीर्थ यात्रेला गेले म्हणून झाली का? ते आता फार बोलताय - राणे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टेच्यू ऑफ यूनिटीमध्ये रिकॉर्डेड संदेशातून देशवाशियांना संबोधित केलं.
  • समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मी उभा, रामदास आठवलेंची भूमिका

Whole Day Top 5 News 31 October 2021 । नवी दिल्ली :  Headlines of the 30 October 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आजची पहिली बातमी पोप फ्रान्सिस यांनी भारत भेटीचं निमंत्रण स्विकारल्याची आहे. आजची दुसरी बातमी नाराय राणेंनी नवाब मलिक यांच्यावर हल्लोबोल केल्याची आहे. आजची तिसरी बातमी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाला संबोधन केल्याची आहे. आजची चौथी बातमी उत्तराखंडमधील बस अपघाताची आहे. आजची पाचवी बातमी समीर वानखेडे प्रकरणात रामदास आठवले यांच्या एन्ट्रीची आहे. 

  1. Pope Francis accepts invitation to visit India: जी-20 मध्ये पंतप्रधान मोदींनी दिला 'वन अर्थ-वन हेल्थ' चा मंत्र; भारताच्या दौऱ्यासाठी पोप उत्सुक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जी20 (G-20) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी इटली (Italy Tour) दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची ही आठवी बैठक आहे. या वर्षीची G20 देशांची बैठक ही इटलीतील रोममध्ये होत आहे. इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी शनिवारी प्रथम वेटिकन शहरात दाखल झाले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहे? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी - नारायण राणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज(रविवार) बुलडाणा येथे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP spokesperson) व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minorities Minister Nawab Malik) व अन्न व नागरी पुरवठामंत्री (Food and Civil Supplies Minister) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. National Unity Day : पंतप्रधान मोदी म्हणाले, सरदार पटेल फक्त इतिहासात नाही, तर देशवाशियांच्या हृदयात : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार पटेल यांची जयंती (Sardar Vallabhbhai Patel Birth Anniversary) निमित्त गुजरातच्या (Gujarat) केवड़िया येथील स्टेच्यू ऑफ यूनिटीमध्ये (Statue of Unity) रिकॉर्डेड संदेशातून देशवाशियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्व देशवाशियांना राष्ट्रीय एकता (National Unity Day ) दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. Uttarakhand Bus crashed into a ravine : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 13 जणांचा जागीच मृत्यू :  उत्तराखंडमध्ये बसला भीषण (Uttarakhand bus accident) अपघात झाला आहे. देहरादून (Dehradun) येथील विकासनगर (Vikasnagar ) परिसरातील बुल्हाड बायला (Bulhad Bayla) रोडवरील दरीत बस कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतरही काही जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुल्हाड बायला रोडवरुन जाणारी बस दरीत कोसळली. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. Sameer Wankhede case | 'पिक्चर अभी बाकी है, मेरा रोल भी अभी बाकी है', असे म्हणत रामदास आठवलेंची एन्ट्री : समीर वानखेडे प्रकरणाला रोजच नवे वळण लागत आहे. नवाब मलिक (Nawab Malik) समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत तर समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबिय त्यांची बाजू मांडत आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर या मीडियासमोर त्यांच्या कुटुंबाची बाजू मांडताना दिसत आहेत. समीर वानखेडे  (Sameer Wankhede )यांनी मागासवर्गीय आयोगाकडेदेखील धाव घेतली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी