दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ४ मे २०२१: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन ते देशात येणारं ५ जी नेटवर्क

लोकल ते ग्लोबल
Updated May 04, 2021 | 19:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the 4 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा.

Whole Day Top 5 News 4 May 2021
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ४ मे २०२१  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • चार जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी होत नसल्याने होणार लॉकडाऊन
  • २७ वर्षानंतर बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा होणार वेगळे
  • आयपीएल २०२१ वर काही काळासाठी स्थगिती

मुंबई : Headlines of the 4 May 2021: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. आपली आजची पहिली बातमी राज्यातील काही भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे, याविषयची आहे. आजची दुसरी बातमी ही सर्वांच्या आवडीची आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. आजची तिसरी बातमी कोरोना रुग्णांविषयी निगडीत असलेल्या आयसीयूच्या निर्मितीविषयी आहे. काही नागरीक घरातच त्याची निर्मिती करत आहेत. आजची चौथी बातमी आहे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या मोडलेल्या संसाराची. तर आपली पाचवी बातमी देशात येणाऱ्या ५ जी नेटवर्कची आहे. 

  1. कोरोनाचा कहर: महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन : गेल्या २४ तासात देशातील आकडेवारी थोडीफार कमी जरी वाटत असली तरी कोरोनाचं रौद्र रुप अजून जैसे च्या स्थितीत आहे. विशेषत राज्यात कोरोनाने मोठं थैमान घातले असून राज्यात कोरोनाने  मृत पावणाऱ्यांचा आकडा इतर राज्यांपेक्षा मोठा आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  2. आयपीएलला स्थगिती, बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची माहिती : आयपीएलवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  3. कोरोनापासून बचावासाठी घरातच बनवले आयसीयू, सेटअपसाठी किती येतो खर्च, जाणून घ्या : दुसऱ्या लाटेने देशभर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटापासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी लोक प्रचंड प्रयत्न करत आहेत. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  4. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स होणार वेगळे; २७ वर्ष टिकला संसार :  मायक्रोसॉफ्टचे संस्थापक  बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा  यांनी २७ वर्षांच्या वैवाहीक आयुष्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
  5. भारतात लवकरच बहुचर्चित ' 5 G' सेवा, चाचणीला दूरसंचार विभागाची मंजूरी, चीनी कंपन्यांना ठेवले दूर: दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने देशातील दूरसंचार कंपन्यांना '५ जी' सेवेच्या चाचणीची परवानगी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी लिंकवर क्लिक करा.
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी