Children’s day 2022: पंडित नेहरूंच्या जन्मदिनी का साजरा होतो बालदिन? वाचा इतिहास आणि महत्त्व

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं प्रेमाने 'चाचा नेहरू' असे म्हणायची. पंडित नेहरू नाही लहान मुलांची आवड होती आणि ते सतत लहान मुलांमध्ये रमत असत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मुलांच्या आणि तरुणांच्या अधिकारासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी बरंच मूलभूत काम केलं.

Children’s day 2022
पंडित नेहरूंच्या वाढदिवशी का साजरा होतो बालदिन?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंडित नेहरूंच्या जन्मदिनी का साजरा केला जातो बालदिन?
  • पंडित नेहरुंनी लहान मुलांसाठी केले मोठे काम
  • अनेक शिक्षणसंस्था उभारून उज्ज्वल केले देशाचे भवितव्य

Children’s day 2022: मुलं ही देवाघरची फुलं, असं म्हटलं जातं. मुलांची देखभाल, त्यांचे शिक्षण आणि त्याविषयीची जागरूकता यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबरला बालदिन (Children’s day) साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा करण्यात येतो. पंडित नेहरू लहान मुलांवर प्रचंड प्रेम करत असत आणि त्यांना मुलांमध्ये रमायची आवड होती. त्यामुळेच त्यांच्या जन्मदिवशी बालदिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे पंडित नेहरूंच्या निधनानंतरही दरवर्षी 14 नोव्हेंबरला देशभर बालदिन उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया, याचा इतिहास आणि महत्त्व

14 नोव्हेंबरला का साजरा होतो बालदिन?

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं प्रेमाने 'चाचा नेहरू' असे म्हणायची. पंडित नेहरू नाही लहान मुलांची आवड होती आणि ते सतत लहान मुलांमध्ये रमत असत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी मुलांच्या आणि तरुणांच्या अधिकारासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी बरंच मूलभूत काम केलं. पंतप्रधान झाल्यानंतर मुलांचे शिक्षण हा त्यांचा अग्रक्रम होता. राष्ट्रीय धोरण आखताना त्यांनी शालेय शिक्षणाचा बराच विचार केला होता. उच्च शिक्षणासाठी देखील त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भारतीय प्रबंधन संस्था आणि आयआयटी सारख्या संस्था नेहरूंच्या संकल्पनेतून उभ्या राहिल्या. मुलांचं आणि देशाचं भवितव्य उज्वल बनवण्यामध्ये या संस्थांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विनाशुल्क प्राथमिक शिक्षण, उपोषणावर उत्तर म्हणून शाळांमध्ये मोफत भोजन यासारख्या अनेक योजना राबवल्या. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जयंतीच्या तारखेला बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंडित नेहरुचं लहान मुलांवर असणारं प्रेम आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या संस्था आणि रुजवलेले विचार यासाठी नेहरूंच्या जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. 

अधिक वाचा - Maharashtra Breaking news 11 November 2022 Latest Update: दिवसभरातील घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

पंडित नेहरूंचे विचार

देशाचे उज्वल भवितव्य लहान मुलांच्याच हाती आहे, असा पंडित नेहरूंचा विश्वास होता. मुलांना योग्य शिक्षण मिळालं आणि त्यांचे योग्य प्रकारे पालनपोषण करण्यात आलं, तर आपल्या देशाला ते नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात, असा त्यांना विश्वास होता.

अधिक वाचा - Gujarat Election 2022 : हार्दिक पटेलला गुजरात निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी, माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचे कापले तिकीट

काही ऐतिहासिक तपशील

1925 यावर्षी बालदिन ही संकल्पना उदयाला आली आणि 1953 साली जगभरात याला मान्यता मिळाली. संयुक्त राष्ट्र संघाने 20 नोव्हेंबर या दिवशी जगभरात बालदिन साजरा करण्याची घोषणा केली. मात्र प्रत्येक देशात वेगवेगळ्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. 1 जून 1950 या दिवसापासून जगातील अनेक देशांमध्ये बाल संरक्षण दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिला बालदिन 1959 साली साजरा झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी