Covaxin : कोरोनाविरुद्धच्या खेळात परत येण्यासाठी अमेरिकेत Made-in-India Covaxin ला संधी का नाही - माजी अमेरिकन टेनिसपटू

Covaxin : भारताच्या 'भारत बायोटेक' (Bharat Biotech) कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) लशीला अमेरिकेत अद्याप नामंजुरी आहे. दरम्यान तेथील अनेक घटकांकडून लशीला परवानगी मिळावी याची मागणी करत आहेत.

Former American Tennis Player Support Covaxin
माजी अमेरिकन टेनिसपटू जिमी कॉनर्स  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारतीय लस कोवॅक्सिन प्रभावी
  • 15-18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरण
  • 10 जानेवारीपासून आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी “सावधगिरीचा डोस” दिला जाणार आहे.

Covaxin : नवी दिल्ली : भारताच्या 'भारत बायोटेक' (Bharat Biotech) कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन (Covaxin) लशीला अमेरिकेत अद्याप नामंजुरी आहे. दरम्यान तेथील अनेक घटकांकडून लशीला परवानगी मिळावी याची मागणी करत आहेत. आता  आठवेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन (Grand Slam champion) असलेले माजी अमेरिकन टेनिसपटू (Former American tennis player) जिमी कॉनर्स (Jimmy Connors) यांनी भारतीय लस कोवॅक्सिनचं समर्थन केलं आहे. 

 कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारतीय लस कोवॅक्सिन प्रभावी असल्याने त्याला यूएस एफडीएने मान्यता दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतीय लसीला अधिकृतपणे मान्यता दिली आहे. तरीही अमेरिकेने कोवॅक्सिनला अद्याप परवानगी दिलेली नाही, यावर माजी अमेरिकन टेनिसपटू (Former American tennis player) जिमी कॉनर्स (Jimmy Connors) यांनी अमेरिकेच्या सरकारला प्रश्न केला आहे.  आता, पाचवेळा यूएस ओपन चॅम्पियन राहिलेल्या खेळाडूने प्रश्न उपस्थित केला आहे की, इतर विविध लसी उपलब्ध असताना कोवॅक्सिनला यूएसकडून संधी का दिली जात नाही?

भारतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री टेलिव्हिजनवरुन देशाला  संबोधित करताना घोषणा केली की, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी   15-18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरण सुरू केले जाईल. तर 10 जानेवारीपासून आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी “सावधगिरीचा डोस” म्हणून तिसरा डोस दिला जाणार आहे. कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमायक्रॉनची प्रकरणे आणि कोरोनाचे वाढता रुग्णसंख्येमुळे हे निर्णय घेण्यात आले आहेत. 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सावधगिरीचा डोस देखील उपलब्ध केला जाईल, असे पंतप्रधान म्हणाले होते.

स्वदेशी विकसित ZyCoV-D ही जगातील पहिली DNA-आधारित सुई-मुक्त Covid-19 लस आहे. कोविड-19 लसीचा दुसरा आणि तिसरा डोस, ज्याला “सावधगिरीचा डोस” असे संबोधले जात आहे, त्यामधील अंतर नऊ ते 12 महिन्यांचा असण्याची शक्यता आहे.लसीकरणाच्या नवीन श्रेणीची नोंदणी करण्यासाठी CoWIN पोर्टलवर आवश्यक बदल केले जात आहेत. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने शुक्रवारी काही अटींसह 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी स्वदेशी कोवॅक्सिनला आपत्कालीन वापराची परवानगी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी