Indian Railway Facts: संपूर्ण भारतातून लाखो - करोडोच्या संख्येने प्रवाशी रेल्वेतून प्रवास करत असतात. भारतीय रेल्वे दरदिवशी या सर्व प्रवाश्यांना त्यांच्या निर्धारित वेळेनुसार आणि योग्य ठिकाणी पोहोचवण्याची सेवा बजावतात. मात्र, रेल्वेतून प्रवास करताना काही असे विचार आपल्या डोक्यात येतात ज्याचे उत्तर आपल्याकडे नसतेच !
तुम्ही पाहिले असतील की विजेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनच्या छतावर एक ओवरहेड वायर जोडलेली असते. ज्यावर ट्रेनचे पेंटोग्राफ चिटकलेले असते, आणि त्या सहाय्याने ट्रेन चालते. रेल्वेचा हा पेंटोग्राफ हजारों किलोमीटरपर्यंत ही ओवरहेड वायर घासत जाते. पण तरीही, ती झिजत नाही. असे का होते? चला जाणून घेऊ.
जेव्हा दोन वस्तूंचे घर्षण होते तेव्हा नाजुक वस्तू खूप जास्तप्रमाणात घासली जाते, हा सिद्धांत आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हेच सूत्र इथे देखील लागू होते. रेल्वे रूळावर विजेची जी तार लावली जाते, ती शक्तिशाली कॉपरची बनलेली असते.
इंजिनच्या पेंटोग्राफचा वरचा भाग या तारेला चिटकलेला असतो. हा पेंटोग्राफ नरम लोखंडापासून बनवलेला असतो. जेव्हा ओव्हरहेड वायर आणि पेंटोग्राफ दरम्यान घर्षण होते तेव्हा विजेची तार नव्हे तर पेंटोग्राफ सर्वाधिक घासला जातो.
हे पण वाचा : Central Bank of India Recruitment: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, Apply Online
रेल्वे हजारो किलोमीटरचा प्रवास करत असते. अश्यावेळी कुठे वळण आले तर ओव्हरहेड वायरीसोबत पेंटोग्राफचा संबंध तुटण्याची दाट शक्यता असते. ही अडचण दूर करण्यासाठी पेंटोग्राफच्या खाली एक बॉक्स लावण्यात येतो, ज्याद्वारे त्याला प्रेशर दिला जातो.
जेव्हा वायर खाली येते, तेव्हा पेंटोग्राफ सटकून मागच्या बाजूला जाते, आणि अश्यापद्धतीने दोघांवरचे प्रेशर कमी होते, आणि याच प्रेशरच्या सहाय्याने पेंटोग्राफ ओव्हरहेड तार वरच्या बाजूस दाबून ठेवते. जेणेकरून दोघांचा ही एकमेकांवर दाब पडत नाही.
हे पण वाचा : Maharashtra Rain Updates:मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, महाराष्ट्रात अजून किती दिवस होणार पाऊस?
पेंटोग्राफला एअर प्रेशरद्वारे हाताळले जाते. गरज भासल्यास पेंटोग्राफ वर किंवा खाली देखील करता येऊ शकते. मुख्यत्वेकरून मालगाडी किंवा डबल डेकरवाल्या रेल्वे गाड्यांना उंच पेंटोग्राफची गरज असते.
उदाहरणार्थ, दिल्ली ते मुंबईदरम्यानच्या रेल्वे मार्गावर खास डबल डेकर आणि माल गाड्यांसाठी फ्रेट कॉरिडोर बांधले जात आहेत.
असे झाल्यास ओव्हर हेड वायर विशेष उंचीवर बांधल्या जातील आणि एअर प्रेशरच्या माध्यमातून पेंटोग्राफला देखील वर केले जाईल.