पाकिस्तानने भारताकडे का मागितली नाही कोरोनाची लस? यामागे हे कारण तर नाही ना?

भारताने नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, सेशेल्स आणि मॉरिशिअस अशा आपल्या शेजारी देशांना कोरोनाच्या लसींचे डोस पाठवले आहेत. अद्याप अनेक देशांना भारताकडून लस हवी आहे.

Corona vaccine Pakistan
पाकिस्तानने भारताकडे का मागितली नाही कोरोनाची लस? यामागे हे कारण तर नाही ना? 

थोडं पण कामाचं

  • कोरोनाच्या लसीसाठी पाकिस्तानचा सायनोफॉर्म या चीनी कंपनीशी करार
  • सायनोफॉर्म पाकिस्तानला देणार 11 लाख कोरोना लसीचे डोस, अद्याप खेप पोहोचलेली नाही
  • कोरोनावरील लस अद्याप न मिळाल्याने पाकिस्तानची अस्वस्थता जगजाहीर

नवी दिल्ली : जगातील (World) सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण अभियानाशी (corona vaccine drive) जोडल्या गेलेल्या भारताने (India) आपल्या शेजारी देशांसह (neighboring countries) जगभरातील अनेक देशांना कोरोनाची लस (corona vaccine) पाठवली आहे. याला भारताची लस डिप्लोमसी (vaccine diplomacy) म्हटले जात आहे, मात्र भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानला (Pakistan) अद्याप कोरोनाची लस मिळालेली नाही. या लसीसाठी पाकिस्तान चीनवर (China) अवलंबून आहे. चीनच्या सायनोफॉर्म या कंपनीकडे पाकिस्तानने 11 लाख डोसची बुकिंग केली आहे. या डोसमधून साधारण साडे पाच लाख लोकांनाच लस मिळेल. पाकिस्तानची लोकसंख्या 22 कोटी आहे आणि या सर्वांना लस देण्यासाठी त्यांना 44 कोटी डोसची गरज आहे.

भारताने शेजारी देशांना मोफत पाठवली लस

भारताने नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदीव, सेशेल्स आणि मॉरिशिअस अशा आपल्या शेजारी देशांना कोरोनाच्या लसींचे डोस पाठवले आहेत. सौदी अरेबिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेसह इतर सर्व देशांना भारतीय लस पोहोचली आहे. भारत या सर्व देशांना मदत करत आहे, मात्र पाकिस्तानचा यात समावेश नाही. भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. याबाबत तज्ञांचे म्हणणे आहे की भारतीय लसीची मागणी न करणे पाकिस्तान सरकारसाठी स्थानिक राजकारण आणि चीनशी संबंधांची चावी असू शकते.

औषधांसाठी भारताकडून कच्च्या मालाची आयात करतो पाकिस्तान

पाकिस्तानच्या औषधक्षेत्रात भारत आणि पाकिस्तानच्या खासगी औषध कंपन्या प्रदीर्घ काळापासून एकमेकांशी जोडलेल्या आहेत. पाकिस्तान त्यांच्याकडे तयार होणाऱ्या 60 टक्के औषधांसाठीचा कच्चा माल भारताकडून आयात करतो. कॅन्सर, टीबी आणि हृदयाशी संबंधित औषधे आणि रेबीजविरोधी लसही पाकिस्तान भारताकडून खरेदी करतो. औषधांच्या क्षेत्रात पाकिस्तान बऱ्याच अंशी भारतावर अवलंबून आहे, मात्र कोरोनाच्या लसीबाबत त्यांचे मौन कायम आहे.

लसीच्या शर्यतीत पाकिस्तान पडला मागे

जगभरातील सर्व देशांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने कोरोनाची लस मिळवली आहे. दक्षिण आशियाच्या सर्व भागांमध्ये भारताची लस पोहोचली आहे, मात्र पाकिस्तान या शर्यतीत मागे पडला आहे. याची अस्वस्थता त्यांचे सरकार आणि जनतेमध्ये दिसत आहे. लोक आणि पाकिस्तानी माध्यमे इमरान खान सरकारवर नाराज आहेत. यामागे सरकारची दिरंगाई हे कारण असल्याचे म्हटले जात आहे, मात्र कोरोनाच्या या संकटाचा फटका इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानला कमी बसला आहे. या रोगाने पाकिस्तानात आत्तापर्यंत 5 लाख 35 हजार लोकांना संसर्ग झाला आहे तर 11376 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी