Agneepath Scheme : आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, मग सैनिकांना का नाही? तरुणाचा राज्यवर्धन राठौड यांना सवाल

अग्निपथ योजनेवरून देशातील तरुणाई संतप्त आहे. तुम्हा आमदार खासदारांना पेन्शन मिळते, मग सैनिकांना का नाही, असा सवाल एका तरुणाने राज्यवर्धन राठौड यांना केला. त्यावर तुम्हाला कुणी रोखलंय, असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

Agneepath Scheme
आमदार, खासदारांना पेन्शन मिळते, मग सैनिकांना का नाही?   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • आमदार खासदारांना पेन्शन, अग्निवीरांना का नाही?
  • तरुणाचा राज्यवर्धन राठौड यांना सवाल
  • तुम्हाला कुणी रोखलंय, राठौड यांचा प्रतिप्रश्न

Agneepath Scheme :केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात देशातील तरुण सध्या आंदोलन करत आहेत. या योजनेला तरुणांमधून विरोध होत असून या योजनेमुळे तरुणांचं सैन्यात काम करण्याचं स्वप्न भंग होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. नव्या योजनेनुसार सैन्यात भरती होणाऱ्या 75 टक्के तरुणांना चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त केलं जाणार आहे. याबाबत सध्या सर्व माध्यमांत जोरदार चर्चा सुरु आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीवर याबाबत बोलताना एका तरुणानं राज्यवर्धन राठौड यांना एक प्रश्न विचारला. जर लोकांमधून निवडून गेलेल्या आमदार आणि खासदारांना कार्यकाळ संपल्यानंतर पेन्शन मिळते, तर मग चार वर्षांनी सैन्यातून निवृत्त होणाऱ्या सैनिकाला का नाही? असा सवाल या तरुणाने केला. त्यावर तुम्हाला कुणी थांबवलं आहे? असं उत्तर राज्यवर्धन राठौड यांनी दिलं. 

तरुण म्हणाला, एखादा आमदार किंवा खासदार जितक्या वेळा त्याच्या मतदारसंघातून निवडला जातो, तितक्या वेळा त्याला पेन्शन मिळते. सैन्यात दाखल होणाऱ्या बहुतांश तरुणांना आता चार वर्षांनी निवृत्त व्हावं लागणार आहे. अशा तरुणांना पेन्शन का दिली जाणार नाही, असा सवाल तरुणाने केला आहे. चार वर्ष नोकरी करून आल्यावर त्या तरुणानं काय मजुरी करायची का? असा प्रश्न या तरुणाने उपस्थित केला आहे. 

आधिक वाचा -  Food order in Train Journey : रेल्वे प्रवासात आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करण्याची सोपी पद्धत, एका क्लिकवर मिळेल मनपसंत मेन्यू

सामान्य कुटुंबातील तरुणच सैन्यात

सैन्यामध्ये भरती होणारे तरुण हे सामान्य आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. त्यांच्या नावावर कुणीही कुठेही संपत्ती ठेवलेली नसते. जीवावर उदार होऊन भारतीय सैन्यात दाखल होणारे हे तरुण जेव्हा चार वर्षातच निवृत्त होतील, तेव्हा त्यांनी काय करायचं, असा सवाल तरुण करत आहेत. आतापर्यंत एकदा सैन्यात नोकरी मिळाली की 15 वर्षं सेवा असायची. त्यानंतर निवृत्त होऊन सरकारकडून पेन्शन मिळायची. मात्र बहुतांश तरूण चारच वर्षात निवृत्त होतील आणि त्यानंतर भविष्यात काय करायचं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिल, अशी भिती तरूण व्यक्त करत आहेत. 

आधिक वाचा -  शोधू कुठं र... ?, नोटीस द्यायला आलेल्या मुंबई पोलिसांना चार दिवसांपासून नूपुर शर्माचा पत्ता सापडेना

राठौड यांचं प्रत्युत्तर

आमदार आणि खासदारांसोबत सैनिकांच्या पेन्शननची तुलना करणारा प्रश्न विचारल्यानंतर राज्यवर्धन राठौड यांनी त्या तरुणाला प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला आमदार, खासदार होण्यापासून कुणी रोखलं आहे, असा सवाल त्यांनी केला. पेन्शनचे आकडेही त्यांनी तरुणाला सांगितले. जो खासदार निवृत्त होतो, त्याची पेन्शन 1800 ते 1500 रुपयांच्या दरम्यानच आहे. जेव्हा अग्निवीर सेवेतून बाहेर पडेल, तेव्हा त्याला 12 लाख रुपये मिळणार आहेत. सोबतच सैन्याचं सर्टिफिकेट आणि ट्रेनिंगदेखील झालेलं असेल. भारतीय सैन्यात सेवा देऊन आल्याचा गौरवपूर्ण शिक्का त्याच्यावर बसलेला असेल. त्यानंतर तो कुठेही अभिमानाने नोकरी करू शकेल, असं राठौड यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी