'पूर्ण लॉकडाउन' ची गरज का होती?, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाच्या गोष्टी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले आणि जनता कर्फ्यूच्या यशाबद्दल देशाचे आभार मानत पंतप्रधानांनी देश वाचविण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला.

why there is a need for complete lockdown prime minister narendra modi's speech 10 important points
'पूर्ण लॉकडाउन' ची गरज का होती?, पंतप्रधान मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाच्या गोष्टी   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • पुढील २१ दिवस देशात लॉकडाऊन
 • देशात लॉकडाऊन दरम्यान घाबरुन जाण्याची गरज नाही
 • २१ दिवसात घरात राहणं हेच योग्य

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केले आणि पंतप्रधानांनी देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले. पंतप्रधान मोदी आपल्या म्हणाले की, आज रात्री बारा वाजल्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन करण्यात येणार आहे. भारतातील कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

पीएम मोदी म्हणाले की, हा लॉकडाऊन कर्फ्यूसारखाच असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परंतु या लॉकडाऊनने घाबरून जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर सरकारने स्पष्ट केले की आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध राहतील.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील खास मोठ्या गोष्टी जाणून घ्या:

 1. भारताला वाचवण्यासाठी भारतातील प्रत्येक नागरिकास घराबाहेर पडण्यावर आज रात्री १२ वाजेपासून बंदी घातली जात आहे.
 2. पुढील २१ दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, जर आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी किमान २१ दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे.
 3. देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक गाव, प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, परिसर आता बंद असणार आहे.
 4. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा कर्फ्यूसारखाच  असेल आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परंतु या लॉकडाऊनने घाबरून जाण्याची गरज नाही.
 5. या लॉकडाऊनची देशाला एक आर्थिक किंमत सहन करावी लागेल, परंतु या क्षणी प्रत्येक भारतीयांचे प्राण वाचवणे ही माझी, भारत सरकारची, देशातील प्रत्येक राज्य सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.
 6. आपल्या समोर हा एकमेव मार्ग आहे असे आपण देखील गृहित धरावं, आपल्याला घराबाहेर पडायचे नाही, काहीही झालं तरी आपण घरातच राहिले पाहिजे.
 7. पीएम मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये घाबरून जाण्याची गरज नाही, आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील
 8. रेशन, औषधे, रुग्णालये, फळे आणि भाजीपाला व दुधाची दुकाने खुली असतील, बँका, विमा व एटीएम खुले असतील आणि मांस, मासे उपलब्ध असतील व पशुखाद्य उपलब्ध होईल, पेट्रोल पंप तसेच एलपीजी गॅसही उपलब्ध असतील. मिळत राहील
 9. लॉकडाऊन दरम्यान काही गोष्टींमध्ये सूट मिळविण्यासाठी खोटे दावे केल्याचे आढळले तर दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय अंत्यसंस्कारा दरम्यान २० पेक्षा जास्त लोकांना जमा होण्याची परवानगी नाही.
 10. सरकारी निर्देशांचे पालन न केल्यास किंवा चुकीची माहिती पसरविल्यामुळे एका वर्षाची शिक्षा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी