काँग्रेसच्या 'या' नेत्याने दिला घरचा अहेर, डोळ्यात घातले झणझणीत अंजन

National Herald Case : काँग्रेस नेते आणि UPA सरकारच्या काळातील परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी पक्षाला घरचा अहेर दिला आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

Why UPA's Foreign Minister Natwar Singh was furious at Sonia Gandhi?
काँग्रेसच्या 'या' नेत्याने दिला घरचा अहेर, डोळ्यात घातले झणझणीत अंजन 
थोडं पण कामाचं
  • काँग्रेसच्या नेत्याने दिला घरचा अहेर, डोळ्यात घातले अंजन
  • सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेस गरजेची
  • काँग्रेस पक्षाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गरज उरलेली नाही

National Herald Case : आधी राहुल गांधी आणि २१ जुलै २०२२ रोजी सोनिया गांधींची ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशी केली. प्रत्येकवेळी गांधी परिवाराचे सदस्य ईडी कार्यालयात जाण्याच्यावेळी काँग्रेसने रस्त्यावर आंदोलन केले. काही ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसक आंदोलन केले. या घडामोडींवर काँग्रेस नेते आणि UPA सरकारच्या काळातील परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्याच पक्षाला नटवर सिंह यांनी घरचा अहेर दिला आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काँग्रेस गरजेची आहे. पण काँग्रेस पक्षाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची गरज उरलेली नाही. पक्षाने राजकीय भवितव्याचा विचार करून कृती करावी. गांधी परिवाराऐवजी पक्षाचे नेतृत्व सचिन पायलट किंवा त्याच्या सारख्या एखाद्या तरुण तडफदार नेत्याकडे सोपवणे आवश्यक आहे, असे नटवर सिंह म्हणाले. 

काँग्रेस ज्या पद्धतीने सध्या काम करत आहे ते बघता २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासमोर काँग्रेसचे आव्हान दिसत नाही. भारताचे सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या कामगिरीमुळे देशाची प्रतिष्ठा वाढत असल्याचे दिसत आहे, असे माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह म्हणाले.

कोण आहेत नटवर सिंह?

नटवर सिंह हे यूपीए सरकारच्या काळात २२ मे २००४ ते ६ डिसेंबर २००५ या काळात देशाचे परराष्ट्रमंत्री होते. इराणला अन्नधान्य पुरवणे आणि त्यांच्याकडून तेल आयात करणे असा व्यापार त्या काळात भारत करत होता. हा अन्नाच्या बदल्यात तेल आयात करण्याचा व्यापार सुरू असताना नटवर सिंह आणि त्यांच्या मुलाने मिळून मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. या प्रकरणात राजकीय कोंडी निर्माण झाली आणि काँग्रेसने नटवर सिंह यांना परराष्ट्र मंत्रीपदावरून हटवले. यानंतर नटवर सिंह सक्रीय राजकारणातून मागे पडले. त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून केलेल्या कामाची माहिती देणारे पुस्तक गाजले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी