पत्नीचा कॉफी देण्यास नकार, पतीने उचललं 'असं' पाऊल

पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने एक कप कफी देण्यास नकार दिल्याने पतीने तिच्यावर चक्क गरम पाणी फेकलं आहे.

wife denied to serve coffee husband attack on her in bengaluru crime news
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: pixabay) 

थोडं पण कामाचं

  • पतीने पत्नीवर गरम पाणी फेकले
  • पत्नी २० टक्के भाजली, जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू
  • आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरु

बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे एका व्यक्तीला त्याच्या पत्नीने कॉफी न दिल्याने तो चांगलाच संतप्त झाला आणि पत्नीवर गरम उकळत पाणी फेकलं. उकळत पाणी अंगावर पडल्याने ३ वर्षीय महिला भाजली. या घटनेनंतर पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना कर्नाटकातील डोड्डाबल्लापूरा येथील आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बंगळुरू पोलिसांच्या कंट्रोल रूममधील सूत्रांनी सांगितले की, १६ एप्रिल रोजी दुपारी एका महिलेने फोन करुन मदतीची मागणी केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ महिला हेल्पलाइन (परिहार) कडे रेफर केलं. 

परिहारच्या वरिष्ठ सल्लागार बीएस सरस्वती यांनी सांगितले की, स्पष्ट दिसत होतं की महिलेला खूपच वेदना होत होत्या. पीडितेने सांगितले की, तिच्या पतीने एक कप कॉफी बनवण्यास सांगितले होते. मात्र, मी नकार देताच त्याने माझ्या अंगावर गरम पाणी फेकलं. 

पीडित महिला आपल्या पती आणि मुलांसोबत दक्षिण डोड्डाबल्लापूरा परिसरात राहते. परिहारच्या सल्लागार सरस्वती यांनी सांगितले की, सध्या कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन परिस्थिती आहे. या लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक वाद, घरगुती वादाच्या घटना अनेक समोर येत आहेत. या महिलेच्या घरात एकूण तीन सदस्य आहेत. तिचा पती स्क्रॅप डिलर आहे, सध्याच्या काळात व्यवसाय सुरु नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

पतीने दुपारच्या सुमारास एक कप कॉफी मागितली मात्र, किचनमध्ये भरपूर काम असल्याने पत्नीने कॉफी देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि मग संतप्त झालेल्या पतीने स्टोव्हवरील गरम पाणी पत्नीवर फेकलं. यामुळे पत्नी गंभीर जखमी झाली. 

पीडित महिलेच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूण शेजारी धावत आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. यानंतर परिहारच्या टीमने पीडित महिलेला संपर्क केला. पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी