Shocking Crime News : धक्कादायक, नात्याला काळीमा फासणारी घटना,  पत्नी पतीला सतत सांगत होती, पण सासरा करत होता कायम बलात्कार 

Shocking Rape Case : 8 वर्षांपासून सासरा तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पहिल्या घटनेनंतरच तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पतीला दिली तर त्याने पत्नीलाच धमकावले. आरोपीने एकदा पत्नी आणि दोन्ही मुलांसमोर बलात्काराची घटना घडवली.

wife kept telling husband but father in law keep raping case registered
धक्कादायक, सासरा सतत करत होता सुनेवर बलात्कार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पतीला माहित असताना सासरा सुनेवर करत होता बलात्कार
  • याप्रकरणी गोकुळपुरी पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे
  • पीडित महिलेने फिर्याद दिली

Shocking Rape Case in Delhi : ईशान्य दिल्लीतील (North-west Delhi) गोकुळपुरी (Gokulpuri)पोलिस स्टेशनमध्ये एका सुनेने सासरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा (Rape Case)दाखल केला आहे. 8 वर्षांपासून सासरा तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर पहिल्या घटनेनंतरच तिने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती पतीला दिली तर त्याने पत्नीलाच धमकावले. आरोपीने एकदा पत्नी आणि दोन्ही मुलांसमोर बलात्कार केला होता.  महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी बलात्कार, मारहाण आणि धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.(wife kept telling husband but father in law keep raping case registered)

या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, २७ वर्षीय महिला गेल्या दीड महिन्यांपासून गोकुळपुरी भागात तिच्या नातेवाईकासोबत राहत होती. 2013 मध्ये तिचा विवाह उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी झाला होता. लग्नाच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र त्यानंतर पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे तिचा एकदा गर्भपातही झाला होता.

गुंगीचे औषध देऊ केले बेशुद्ध, नंतर केला रेप 

त्यानंतर महिनाभरानंतर सासऱ्याने तिला गुंगीचे औषधाचा वास देऊन बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला असा आरोप करण्यात आला आहे. महिलेचे वकील विजय गोस्वामी सांगतात की, आरोपीने ही घटना त्याच्या कुटुंबियांसमोरच घडवून आणली.

पीडित महिलेने फिर्याद दिली

दिल्लीतील गोकुळपुरी भागातही ही घटना घडली. यानंतर पतीने दोन्ही मुलांना सोबत घेऊन गावी गेला आणि पत्नीला दिल्लीत  सोडले. महिलेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 22 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी