Wife Lover killed husband: पत्नीनं प्रियकरासोबत असा केला पतीचा खून, लेकीमुळे उघड झाला गुन्हा

आपला पती आपल्या प्रेमसंबंधात अडथळे आणत असल्यामुळे त्याला कायमस्वरुपी संपवण्याचा डाव तिने आपल्या प्रियकरासोबत आखला. पतीचा खून करून ते दोघे गायब झाले. मात्र तिच्या मुलीमुळे तिचा डाव उघड झाला.

Wife Lover killed husband
पत्नीनं प्रियकरासोबत असा केला पतीचा खून  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पत्नीने केला पतीचा निर्घृण खून
  • प्रियकराच्या मदतीने संपवले पतीचे आयुष्य
  • मुलीमुळे उघड झाला खुनाचा डाव

Wife Lover Killed husband: आपल्या प्रियकराच्या (Lover) सांगण्यावर विश्वास ठेवत आणि त्याच्यासोबत संगनमताने आपल्या पतीचा खून (Murder of husband) करणाऱ्या पत्नीला (wife) पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. तिच्या या प्रियकरालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दोघांवर खुनाचा गुन्हा (Crime of murder) दाखल केला आहे. आपल्या प्रेमसंबंधांत आपल्या पतीचा येत असलेला अडथळा दूर करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आणि त्याला वाटेतून कायमचा बाजूला करण्याचा डाव आखला. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत Heading 3पतीचा खून केला आणि प्रियकरासोबत ती फरार झाली. बराच काळ या घटनेचा तपास लागत नव्हता. मात्र अखेर पोलिसांनी या जोडप्याला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. या घटनेने परिसरातील सर्वांना धक्का बसला आहे. 

वीस वर्षांपासून प्रेमप्रकरण

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये राहणाऱ्या उर्मिला नावाच्या महिलेचं संतोष कुमार यांच्यासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगी होती. मात्र उर्मिलाचं आपल्या पतीवर प्रेम नव्हतं. तिचे सुनील नावाच्या एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. गेल्या वीस वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांच्या संपर्कात होते. लग्नापूर्वीचे संबंध लग्नानंतरही त्यांनी सुरु ठेवले होते. ही गोष्ट उर्मिलाचा पती संतोष कुमार यांना मान्य नव्हती. यावरून त्यांची वारंवार भांडणंही होत होती. मात्र त्यानंतरही उर्मिलानं आपल्या वागण्यात काहीही सुधारणा केली नव्हती. 

अधिक वाचा - इमरान खानच्या 'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं झाडली गोळी, कबुलीजबाबात सांगितलं कारण

दोघांनी आखला खुनाचा डाव

संतोष कुमार आणि उर्मिला यांची तिच्या विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यावरून वारंवार भांडणं होत असतं. अनेकदा तर चारचौघांत ते उर्मिलाला यावरून बोलत असत. काही नातेवाईक आणि मित्रमंडळींनादेखील उर्मिलाचं प्रकरण माहित झालं होतं. प्रकरण हाताबाहेर जात असून आपला पती आपल्या संबंधात अडथळा बनत चालल्याची भावना दोघांनाही त्रास देत होती. त्यामुळे दोघांनी ही समस्या कायमची संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी संतोषचा खून करण्याचा डाव आखला.

गळा दाबून खून

घटनेच्या दिवशी संतोष झोपेत असताना दोघांनी त्याच्यावर हल्लाबोल केला. त्याला गुंगीचं औषध हुंगायला देऊन त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कुणालाही संशय येऊ नये, यासाठी हे जोडपं तिथून फरार झालं. मात्र या घटनेचा तपास करत असताना आपल्या आईनं आणि तिच्यासोबत असणाऱ्या इसमानं आपल्या वडिलांचा खून केल्याची माहिती संतोष यांच्या मुलीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. 

अधिक वाचा - पाकिस्तानचे माजी PM इमरान खान गोळीबारात जखमी

सहा महिने गुंगारा

घटनेनंतर तब्बल सहा महिने या जोडप्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर पोलिसांना या दोघांचा पत्ता मिळाला आणि त्यांना अटक करण्यात आली. दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी