Husband For Sale : वेलिंग्टन : जुदाई चित्रपटात श्रीदेवी आपल्या पती अनिक कपूरला दोन कोटी रुपयांत विकून टाकते. आणि चित्रपटात उर्मिला मातोंडकर अनिल कपूरला विकत घेऊन त्याच्याशी लग्न करते. परंतु हे चित्रपटातली गोष्ट आहे. न्युझीलंडमध्ये एका महिलेने अशाच प्रकारे आपल्या नवर्याला विकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी तिने जाहिरातही टाकली होती. परंतु जेव्हा यामागील खरे कारण समोर आले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. (Wife lists husband for sale at auction In New Zealand Know About Shocking Truth)
नवरा बायकोंमध्ये छोटी मोठी भांडणे होतच असतात. कधी कधी काही गोष्टी हाताबाहेर जातात. परंतु न्युझीलंडमध्ये एका पत्नीने हद्दच केली. लिंडा मॅकएलिस्टर नावाच्या महिलेने आपल्या पतीचा ऑनलाईल लिलाव करण्याचा प्रयत्न केल आहे. लिंडाचा पती सारखा फिरायला जायचा. त्यामुळे लिंडाने त्याला ऑनलाईन विकण्याचा प्रयत्न केला. लिंडाचा पती जेव्हा बाहेर गेला तेव्हा लिंडाने आपल्या पतीची ऑनलाईज जाहिरात दिली होती.
लिंडाने जाहिरातीत म्हटले होते की, ६ फूट आणि १ इंच असलेल्या ३७ वर्षीय व्यक्ती एक शेतकरी आहे, त्यांचे अनेक मालक होते. कामाप्रती माझा पती अतिश निष्ठावान आहे. जर त्यांना कोणी विकत घेण्यासाठी इच्छूक असाल तर संपर्क साधा, त्यांची फ्री डिलिव्हरी केली जाईल असे लिंडाने म्हटले होते. या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली होती. असे असले तरी त्यानंतर लिंडाने ही जाहिरात काढून टाकली. परंतु या जाहिरातीखाली अनेकांच्या मजेशीर प्रतिक्रिया आली होती. लिंडाच्या पतीला फिरण्याची खूप हौस आहे. दोघांचे २०१९ साली लग्न झाले असून त्यांना मुलं आहेत. परंतु लिंडाचा पती तिला कामात काहीच मदत करत नाही म्हणून तिने त्याला विकण्याचा प्रयत्न केला होता.