Crime : प्रेमात आला संशय...दिली 65 तोळे सोन्याची सुपारी... पत्नीनेच घडवून आणली हत्या, पाहा सिनेमास्टाइल गुन्हा

Murder Case : नात्यांनाच काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. प्रॉपर्टी डीलरच्या खूनाचे (Murder of Property dealer) प्रकरण पोलिसांनी उलगडले आहे. या खूनाच्या आरोपात पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मित्राला (Wife planned husband's murder)अटक केली आहे. पत्नीच्या प्रियकराच्या मित्रानेच या प्रॉपर्टी डीलरची गोळ्या घालून हत्या केली होती. पोलिसांच्या गुन्हे शाखेने मृताची पत्नी नीतू आणि तिच्या प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे.

Murder by Wife
पत्नीनेच केला खून 
थोडं पण कामाचं
  • पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी
  • खुन्याला दिले 65 तोळे सोने
  • आरोपींना पोलिसांनी केली अटक

Wife planed murder of husband : नवी दिल्ली : अनेकदा अशा पद्धतीने गुन्हे घडतात की ते आपल्याला नात्यांबद्दल विचार करायला लावतात. खासकरून पती आणि पत्नीचे नाते (Husband Wife relationship) हे सर्वात गुंतागुंतीचे नाते असते. हरियाणातील एका खूनाच्या प्रकरणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. नात्यांनाच काळिमा फासणारी ही घटना घडली आहे हरियाणातील गुरुग्राममध्ये. प्रॉपर्टी डीलरच्या खूनाचे (Murder of Property dealer) प्रकरण पोलिसांनी उलगडले आहे. या खूनाच्या आरोपात पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मित्राला (Wife planned husband's murder)अटक केली आहे. पत्नीच्या प्रियकराच्या मित्रानेच या प्रॉपर्टी डीलरची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणातील पत्नीचा प्रियकर सध्या फरार आहे. नेमके हे काय प्रकरण आहे ते पाहूया. (Wife planned husband's murder, gave 650 gram gold to killer)

अधिक वाचा: Video: हातात मशाल होऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री; शिवाजी महाराजांना अभिवादन करून प्रवासाला सुरुवात

पतीची मालमत्ता हडप करण्यासाठीच पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने मृताची पत्नी नीतू आणि तिच्या प्रियकराच्या मित्राला अटक केली आहे. त्याचबरोबर मृतावर गोळ्या झाडणाऱ्या उत्तर प्रदेशातील संभल येथील मोहम्मददीन यालादेखील अटक करण्यात आली आहे. 

लग्नानंतर एकमेकांवर नव्हता विश्वास

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले आहे की 42 वर्षीय प्रॉपर्टी डीलर धर्मेश आणि नीतू यांचे 20 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली आहेत. लग्न झाल्यापासून धर्मेश आणि नीतू दोघांचाही एकमेकांवर विश्वास नव्हता. परिणामी ते एकमेकांवर सतत संशय घेत असत. त्यामुळेच त्या दोघांमध्ये मोठा वाद होत असे. पोलिस चौकशीत नीतूने सांगितले की, तिच्या घरात एक मोलकरीण काम करते. आपल्या पतीचे मोलकरणीशी अनैतिक संबंध असल्याचा तिला संशय होता. यावरून पती-पत्नीमध्ये भांडणे झाली. अखेर त्या मोलकरणीला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी घरात काम करण्यासाठी दुसरी मोलकरीण ठेवली होती. त्या मोलकरणीने सहा महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातील संभल येथील बबलू खान याच्याशी नीतूची मैत्री घडवून दिली होती. नीतूचे बबलूशी बोलणे वाढले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर नीतूने बबलू खानसोबत तीन महिन्यांपूर्वी पतीच्या हत्येची योजना आखली. त्यातूनच या प्रॉपर्टी डीलरची हत्या झाली होती.

अधिक वाचा: Thane : 'हर हर महादेव' वरुन राडा, जितेंद्र आव्हाडांनी चित्रपटगृहातला शो थांबवला

गुन्हेगारांनी आखला होता मोठा प्लॅन

29 ऑक्टोबर रोजी एका बांधकामाच्या प्लॉटमध्ये धर्मेश झोपण्यास जाणार होता. त्याची माहिती नीतूने आपल्या प्रियकराला दिली. ही माहिती मिळताच बबलू खान हा त्याचा मित्र मोहम्मदीनसोबत खून करण्यासाठी तेथे पोहोचला. बबलू खान याने येण्यापूर्वी त्याच्या व मित्राच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून ओळख लपवण्यासाठी गाडीची नंबर प्लेट काढली होती. बबलू खानाने आपण सापडू नये यासाठी अनेक उपाय योजले होते.

पोलिसांचे छापे 

पोलिसांनी या प्रकरणातील माहिती देताना सांगितले की, बबलू खान आणि दोस्त मोहम्मदीन दिल्लीत रंगरंगोटीचे काम करायचे. यातूनच बबलू खानची नीतूशी मैत्री झाली. बबलू खानबद्दल माहिती मिळाल्यानंतर, गुरुग्राम पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी गेले. तिथे गेल्यावर  तो त्याच्या घराचे बांधकाम करत असल्याची माहिती मिळाली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही बबलू खाननेच ठेवल्याचे त्याने सांगितले.

अधिक वाचा : Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

पोलिसांना गुंगारा

खून झाल्यानंतर नीतूचीही चौकशी पोलिसांनी केली होती. मात्र ती पोलिसांच्या हाती आली नाही. ती पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र आरोपी मोहम्मदीन याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनेचा खुलासा केला. त्यानंतर मात्र नीतूने हत्येमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

खूनापूर्वी प्रियकराला दिले 65 तोळे सोने 

पतीची हत्या घडवून आणण्यापूर्वी नीतूने आरोपी बबलू खानला 65 तोळे सोने दिले होते. त्याला खून करता यावा आणि कशाचीही कमतरता पडू नये यासाठी हे केले होते. धर्मेशची हत्या केल्यानंतर सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर होईल आणि त्यांचे लग्न होईल, अशी या दोघांची योजना होती. बबलू खान याने नीतूला हाताशी धरून हा खुनाचा मोठा प्लॅन तयार केला होता. आरोपी पत्नीला एक दिवस तर मोहम्मदीनला तीन दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. फरार बबलू खानला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच तो हाती येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी