wife plunges into river फोटोसाठी पोझ देणारी महिला क्षणार्धात झाली बेपत्ता

wife plunges 100ft to her death into a river while posing for photos पर्यटनासाठी गेलेल्या दांपत्यातील ३३ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. महिला फोटो काढून घेण्यासाठी डोंगरावर एका उंच ठिकाणी उभी होती. तिथून ही महिला क्षणार्धात बेपत्ता झाली.

wife plunges 100ft to her death into a river while posing for photos
फोटोसाठी पोझ देणारी महिला क्षणार्धात झाली बेपत्ता 
थोडं पण कामाचं
  • फोटोसाठी पोझ देणारी महिला क्षणार्धात झाली बेपत्ता
  • ३३ वर्षांच्या जो स्नोक्सचा अपघाती मृत्यू
  • पोलिसांनी दिली माहिती

wife plunges 100ft to her death into a river while posing for photos । लक्झेमबर्ग (Luxembourg): बेल्जियम (Belgium) जवळ असलेल्या लक्झेमबर्ग (Luxembourg) येथे एक धक्कादायक घटना घडली. पर्यटनासाठी गेलेल्या दांपत्यातील ३३ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. महिला फोटो काढून घेण्यासाठी डोंगरावर एका उंच ठिकाणी उभी होती. तिथून ही महिला क्षणार्धात बेपत्ता झाली. नंतर या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार ३३ वर्षांची जो स्नोक्स आणि तिचे पती जोएरी जानसेन हे दोघे फिरत फिरत एका डोंगरावर पोहोचले. तिथे एका उंच ठिकाणी उभी राहून फोटोसाठी पोझ देण्याची इच्छा जो स्नोक्स हिला झाली. फोटोकरिता पोझ देण्याच्या उद्देशाने जो स्नोक्स उंचावर पोहोचली. जोएरी जानसेन फोटो काढण्यासाठी कॅमेरा फ्रेम सेट करत होते, त्या सुमारास मागून कुत्रा आला. कुत्रा जवळ आल्याचे बघून जो स्नोक्सने पतीला सावध केले. जोएरीने मान वळवून कुत्र्याकडे बघितले, त्याच्यापासून त्रास होणार नाही याची जाणीव झाल्यामुळे तो पुन्हा फोटो काढण्यासाठी वळला; त्यावेळी जो स्नोक्स जागेवर नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

फोटोसाठी पोझ देत असलेली जो स्नोक्स उंचावरुन पाय घसरुन मागच्या मागे पडली याची जाणीव होताच जोएरीने तातडीने पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी डोंगराच्या दिशेने एक हेलिकॉप्टर पाठवले. हेलिकॉप्टरद्वारे जो स्नोक्सचा शोध सुरू झाला. अखेर जो स्नोक्स हिचा मृतदेह डोंगराजवळून वाहणाऱ्या नदीत आढळला.

पाय घसरुन मागच्या मागे तोल जाऊन पडल्यामुळे जो स्नोक्स १०० फूट खोलवर नदीत कोसळली. उंचावरुन जोरात पडलेल्या जो स्नोक्सचा मृतदेह नदीत सापडला. प्रथमदर्शनी हा एक अपघात दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जोएरी जानसेन यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याकडे बघण्यासाठी मान वळवली त्यावेळी जो स्नोक्सच्या बाबतीत काय झाले याविषयी ते फक्त अंदाज व्यक्त करू शकतात. कारण पुन्हा फोटो काढण्यासाठी सज्ज होत असताना जो स्नोक्स जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 'मी अंदाज व्यक्त करू शकतो पण जो स्नोक्सच्या बाबतीत नेमके काय झाले हे बघितलेच नाही. फोटोसाठी पोझ देणारी जो क्षणार्धात गायब झाली आणि नदीत मृतावस्थेत आढळली'; असे जोएरी जानसेन यांनी पोलिसांना सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी