बायको नातेवाईकांवर उधळायची पगारातील पैसे, नवऱ्याने केलं भयंकर कृत्य

बायको पतीच्या पगारातील पैसे आपल्या नातेवाईकांवर उधळत असल्याच्या रागातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

wife used to salary on relatives husband strangled her to death
बायको नातेवाईकांवर उधळायची पगारातील पैसे, नवऱ्याने केलं भयंकर कृत्य   |  फोटो सौजन्य: Representative Image

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशमधील  फिरोजाबाद येथे पोलिसांनी एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली मंगळवारी अटक करण्यात आली आहे. एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह १० दिवसांपूर्वी सापडला होता. याच प्रकरणी तपास करताना पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव लाखी जाटव असं आहे. आरोपी पतीवर असा आरोप केला जात आहे की, तिचा नवरा जिपेंद्रसिंग उर्फ ​​भूपेंद्र याने पत्नी त्याच्या पगारातील पैसे हे कोणत्याही वस्तूच्या खरेदीसाठी आणि आपल्या नातेवाईकांवर खर्च करत असल्याचा रागातून पतीने तिचा खून केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी २०१५ मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरूद्ध लग्न केलं होते. हा आंतरजातीय विवाह असल्याने दोन्ही कुटुंबाचा त्याला विरोध होता. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक मुलगीही झाली. लग्नानंतर दोघेही अलीगढच्या गोकुलेशपुरम कॉलनीत राहण्यासाठी गेले होते. येथे  ते भाड्याच्या घरात राहत होते. भूपेंद्र हा एका खासगी कंपनीत कामाला होता. याचदरम्यान त्याची पत्नी ही त्याची असणारी संपत्ती विकून अलीगढच्या मुख्य शहरात घर घेण्यासाठी त्याच्यावर सतत दबाव टाकत होती.

दरम्यान, भूपेंद्रला काही दिवसांनी असंही समजले की, लाखी ही त्याच्या पगारातील एक मोठा हिस्सा तिच्या  नातेवाईकांवर खर्च करते, याच गोष्टीचा त्याला खूप राग यायचा. यावरुन दोघांमध्ये अनेकदा भांडणं देखील व्हायची. अखेर २९ जानेवारीला त्यान आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला. ३० जानेवारीला तो पत्नी आणि मुलगीला अलीगड येथे घेऊन गेला आणि रात्री १ वाजेच्या सुमारास त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह नाल्यात फेकला.

दरम्यान, पोलिसांना असा संशय आहे की, ज्या पद्धतीने भूपेंद्रने त्याच्या बायकोची हत्या केली त्यावरुन असं वाटतं की, यामध्ये भूपेंद्रच्या इतर नातेवाईकांचाही सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांनी लाखीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास देखील सुरू केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...