Supreme Court: नवी दिल्ली: महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर ठाकरे सरकार (Thackeray Govt) कोसळून शिंदे सरकार (Shinde Govt) हे अस्तित्वात आलं आहे. पण हे सरकारच मुळी बेकायदेशीर असल्याचा दावा करत आमदारांना अपात्र ठरवावं असा युक्तिवाद आज (20 जुलै) झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने करण्यात आला. यावेळी शिंदे गटाची बाजू नामांकित विधिज्ञ हरीश साळवे (Harish Salve) यांनी मांडली. (will cm make those who do not have support of 20 mla see harish salve argument in supreme court)
यावेळी युक्तिवादादरम्यान शिवसेनेच्या वतीने जे-जे मुद्दे मांडण्यात आले होते. ते सगळे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांनी केला. पाहा आपल्या युक्तिवादात साळवे यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
हरीश साळवेंचा युक्तिवाद
अधिक वाचा: शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, खासदाराचा गौप्यस्फोट
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी पुढील सुनावणी ही एक ऑगस्टला घेणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांना ज्या अपत्रातेच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्याबाबतीत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजे कोणीच कोणाच्या आमदारांचं निलंबन करु नये असं कोर्टाने यावेळी म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने २७ जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ दिला आहे.