VHP : आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केल्यास पोलिसांविरोधात युद्ध पुकारू, विश्व हिंदू परिषदेची दर्पोक्ती

आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली तर आम्ही दिल्ली पोलिसांविरोधात युद्ध पुकारू अशी धमकी विश्व हिंदू परिषदेने दिली आहे. शनिवारी दिल्लीच्या जहांगिरीपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचा स्थानिक नेता प्रेम शर्मा याला अटक केली होती.

delhi police
दिल्ली पोलीस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली तर आम्ही दिल्ली पोलिसांविरोधात युद्ध पुकारू
  • अशी धमकी विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.
  • शनिवारी दिल्लीच्या जहांगिरीपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता.

Vishwa Hindu Parishad : नवी दिल्ली : आमच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली तर आम्ही दिल्ली पोलिसांविरोधात युद्ध पुकारू अशी धमकी विश्व हिंदू परिषदेने दिली आहे. शनिवारी दिल्लीच्या जहांगिरीपुरीत हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचा स्थानिक नेता प्रेम शर्मा याला अटक केली होती. सरकारी कामकाजात बाधा आणल्याप्रकरणी पोलिसांनी शर्माला अटक केली होती. नंतर पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले. तसेच प्रेम शर्माला फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतले होते असे पोलिसांनी स्पष्ट केले तसेच या प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचे नावही घेण्यास टाळले.  (Will launch 'battle' against Delhi Police if any action is taken against our activists: VHP)

वायव्य दिल्लीच्या पोलीस आयुक्त उषा रंगणानी म्हणाल्या की शनिवारी हनुमान जयंतीच्या दिवशी विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.   


यावर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका कार्यकर्त्याला अटकही करण्यात आली आहे. असे करून पोलिसांनी मोठी चूक केल्याचे बन्सल म्हणाले. तसेच पोलिसांनी इस्लामी जिहाद्यांपुढे गुडघे टेकले आहेत. जर या मिरवणुकीची कुठलीच परवानगी दिली नव्हती तर मोठ्या प्रमाणात पोलीस तिथे का पहारा देत होते? असा सवाल बन्सल यांनी उपस्थित केला आहे. 

विश्व हिंदू परिषद एक कायदा मानणारी संघटना आहे. अशा प्रकारे आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होती. अशा प्रकारे कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही. तसेच पोलिसांनी आमच्याविरोधात खोट्या केसेस दाखल करुन कुठल्याही कार्यकर्त्याला अटक केली तर दिल्ली पोलिसांविरोधात आम्ही युद्ध पुकारु अशी उघड धमकी बन्सल यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी