Mahant Bajarang Das : तर मुस्लिम महिलांवर बलात्कार करू, मंदिराच्या महंताने दिली धमकी, गुन्हा दाखल झाल्यानंतर मागितली माफी

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या एका महंताने मुस्लिम महिलांवर बलात्कार करू अशी उघड धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि महिला आयोगाने दखल घेतली आहे.

mahanat bajrang das
महंत बजरंग दास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • एका महंताने मुस्लिम महिलांवर बलात्कार करू अशी उघड धमकी दिली आहे.
  • या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि महिला आयोगाने दखल घेतली आहे.

Mahant Bajarag Das : लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या एका महंताने मुस्लिम महिलांवर बलात्कार करू अशी उघड धमकी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि महिला आयोगाने दखल घेतली आहे. पोलिसांनी य महंताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती मिळताच या मंहताने माफी मागितली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या सीतापुर जिल्ह्यातील खैराबाद भागात नवरात्र निमित्ताने शोभायात्रा निघाली होती. तेव्हा बडी संगतचे महंत बजरंग दास यांनी वादग्रस्त विधान केले आहे.  महंत म्हणाले की जर आमच्या हिंदू मुलींची तुम्ही जर छेड काढली तर तुमच्या घरात घुसू तुमच्या महिलांवर बलात्कार करू. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. पोलिसांनी आणि महिला आयोगाने या व्हिडीओची दखल घेतली. पोलिसांनी तत्काळ या महंताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

आपल्यावर गुन्हा दाखल झाला आहे याची माहिती मिळताच महंत बजरंग दास यांनी एक व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे. तसेच आमच्या मुलींना त्रास दिल्यास त्यांच्याही मुलींना त्रास होईल असे आपल्याला म्हणायचे होते परंतु आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आपल्यावर खोटा आरोप केला असून आपल्याला गोवण्यात आल्याचेही महंत म्हणाले. आपण सर्व स्त्रियांचा सन्मान करत असल्याचेही बजरंगदास यांनी नमूद केला. एखाद्या वादात अडकणे ही महंत बजरंगदास यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी बजरंग मुनी दास यांच्यावर बेकायदेशीरपणे  जमीन बळकावल्याचा आरोप झाला होता. 

महंत बजरंगदास यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनेचा तपासही सुरू केला आहे. या व्यक्तीविरोधात कड कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी