Terror Funding: यासीन मलिकला फाशी होणार की जन्मठेप? कोर्टाची सुनावणी पूर्ण, दुपारी 3.30 वाजता येईल निर्णय

काश्मिरी फुटीरतावादी (Kashmiri separatists) नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दिल्ली न्यायालयाने (Delhi court) दोषी ठरवलेल्या शिक्षेबाबत आज (बुधवारी) दुपारी 3.30 वाजता निर्णय होणार आहे. गेल्या १९ मे रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असून मलिकला फाशी किंवा जन्मठेपेची (life-imprisonment) शिक्षा होऊ शकते.

Terror Funding: Will Yasin Malik be hanged or sentenced to life imprisonment?
यासीन मलिकला फाशी होणार की जन्मठेप?   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) प्रमुख यासीन मलिकने दहशतवादी निधीशी संबंधित एका प्रकरणात सर्व आरोपांची कबुली दिली.
  • मलिक वर UAPA अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.
  • या प्रकरणात, मलिकला जास्तीत जास्त शिक्षा म्हणून मृत्युदंड, तर किमान शिक्षा म्हणून जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

Terror Funding Case: काश्मिरी फुटीरतावादी (Kashmiri separatists) नेता यासिन मलिक (Yasin Malik) याला दिल्ली न्यायालयाने (Delhi court) दोषी ठरवलेल्या शिक्षेबाबत आज (बुधवारी) दुपारी 3.30 वाजता निर्णय होणार आहे. गेल्या १९ मे रोजी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले असून मलिकला फाशी किंवा जन्मठेपेची (life-imprisonment) शिक्षा होऊ शकते.

मान्य केला गुन्हा

जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) प्रमुख यासीन मलिकने दहशतवादी निधीशी संबंधित एका प्रकरणात सर्व आरोपांची कबुली दिली होती. मलिक वर UAPA अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. यासीन मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. याप्रकरणी मलिकने आपला गुन्हा कबूल केला होता.

या कलमांमध्ये आरोप सिद्ध 

कोर्टात त्याने सांगितले होते की तो कलम १६ (दहशतवादी कायदा), १७ (दहशतवादी कृत्यासाठी निधी गोळा करणे), १८ (दहशतवादी कृत्य करण्याचा कट), UAPA च्या कलम २० (दहशतवादी टोळी किंवा संघटनेचा सदस्य असणे) अंतर्गत आहे. आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-बी (गुन्हेगारी कट) आणि 124-ए (देशद्रोह) यासह त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची लढाई करणार नाही.

न्यायालयाने दोषी ठरवले

19 मे रोजी विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी मलिकला दोषी ठरवले आणि राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) त्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी त्याच्यावर लावला जाणारा दंड निश्चित करण्यास सांगितले.  या प्रकरणात, मलिकला जास्तीत जास्त शिक्षा म्हणून मृत्युदंड, तर किमान शिक्षा म्हणून जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी