भारतीय तटरक्षक दलाचा मोठा विजय, चीनचा पराभव

आशिया खंडाला खेटून असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील चाचेगिरी, लुटमार, तस्करी तसेच सागरी क्षेत्रातील सर्व प्रकारची गुन्हेगारी यांना आळा घालण्यासाठी भारताच्या नेतृत्वात काम होणार आहे.

Win for India Against China as K Natarajan Becomes Executive Director of Asian Maritime Body ReCAAP
भारतीय तटरक्षक दलाचा मोठा विजय, चीनचा पराभव 
थोडं पण कामाचं
  • भारतीय तटरक्षक दलाचा मोठा विजय, चीनचा पराभव
  • आशिया सागरी क्षेत्रात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकारी संचालकपदी भारतीय तटरक्षक दलाचे महालंचालक
  • भारताच्या अधिकाऱ्याला २१ पैकी १४ देशांचा पाठिंबा

नवी दिल्ली: आशिया खंडाला खेटून असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील चाचेगिरी, लुटमार, तस्करी तसेच सागरी क्षेत्रातील सर्व प्रकारची गुन्हेगारी यांना आळा घालण्यासाठी भारताच्या नेतृत्वात काम होणार आहे. आशिया सागरी क्षेत्रात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकारी संचालकपदी भारतीय तटरक्षक दलाचे महालंचालक के. नटराजन (Director General Of Indian Coast Guard K. Natarajan) यांची बहुमताने निवड झाली. संघटनेचे सदस्य असलेल्या २१ देशांनी मतदान केले. यावेळी भारताला १४ मते मिळाली.  के. नटराजन २०२२ मध्ये पदभार स्वीकारतील. निवडणुकीत चीनचा पराभव झाला. Win for India Against China as K Natarajan Becomes Executive Director of Asian Maritime Body ReCAAP

आशिया सागरी क्षेत्रात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेचे मुख्यालय सिंगापूर येथे आहे. सोप्या शब्दात या संघटनेला रीकॅप (Regional Cooperation Agreement on Combating Piracy and Armed Robbery against Ships in Asia - ReCAAP) या नावाने ओळखतात. या संघटनेच्या कार्यकारी संचालकाची निवड करण्यासाठी मतदान झाले. निवडणुकीत भारत, चीन आणि फिलिपिन्स या तीन देशांच्या तटरक्षक दलांचे प्रमुख उमेदवार म्हणून उभे होते. मतदानाच्यावेळी संघटनेचे सदस्य असलेल्या २१ देशांपैकी १४ देशांचा पाठिंबा भारतीय तटरक्षक दलाचे महालंचालक के. नटराजन यांना मिळाला. हा आंतरराष्ट्रीय पटलावर चीन विरोधात भारताला मिळालेला एक मोठा विजय आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करुन भारतीय तटरक्षक दलाचे महालंचालक के. नटराजन यांचे विजयासाठी अभिनंदन केले. 

अफगाणिस्तानमध्ये शांती सेना जाणार?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी