winter session of parliament संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून

winter session of parliament will be held between 29 november to 23 december 2021 । भारताच्या संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे.

winter session of parliament will be held between 29 november to 23 december 2021
संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून 
थोडं पण कामाचं
  • संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून
  • हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार
  • लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाचवेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन होईल

winter session of parliament will be held between 29 november to 23 december 2021 । नवी दिल्ली: भारताच्या संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणार आहे. कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षात अधिवेशनाच्या आयोजनावेळी अनेक बंधनांचे पालन करावे लागले होते. मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशनाऐवजी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. 

आता २९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ या कालावधीत संसदेचे हिवाळी अधिवेशन होईल, असे संसदेच्या कामकाज सल्लागार समितीने जाहीर केले. हिवाळी अधिवेशनात वीस दिवस कामकाज होईल. इतर दिवस हे सुटीचे आहेत. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाचवेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करुन होईल.

हिवाळी अधिवेशनात दहशतवाद, जम्मू काश्मीरमधील स्थिती, भारत-चीन प्रश्न, महागाई या मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. लखीमपूर हिंसा, कृषी कायदे या विषयांवरही चर्चेची शक्यता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी