लुडोमध्ये वडिलांनी केली चीटिंग, मुलीने कोर्टात मागितली दाद

woman approaches Family Court, alleging cheating by her father in a ludo लुडोत वडिलांनी चीटिंग केली म्हणून मुलीने कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली.

ludo
लुडो 

थोडं पण कामाचं

  • लुडोमध्ये वडिलांनी केली चीटिंग, मुलीने कोर्टात मागितली दाद
  • लुडो आणि गुन्ह्यांचे विचित्र कनेक्शन
  • काय आहे लुडो?

भोपाळ: मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळ (Bhopal) येथे विचित्र घटना घडली. एका २४ वर्षांच्या तरुणीने वडिलांविरोधात कौटुंबिक न्यायालयात (Family Court) दाद मागितली आहे. वडिलांनी लुडो (ludo) खेळताना चीटिंग (cheating) केली अशी तक्रार मुलीने केली आहे. (woman approaches Family Court, alleging cheating by her father in a ludo)

वडिलांवरती प्रचंड विश्वास होता. ते खेळात सुद्धा फसवणार नाही असे वाटायचे. पण लुडो खेळताना वडिलांनी चीटिंग केली. या प्रकारामुळे दुखावल्याची तक्रार तिने केली. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून मुलीचे समुपदेशन करण्यासाठी एका महिला समुपदेशकाची (Counsellor) नियुक्ती केली. तब्बल चार वेळा समुपदेशन (Counselling) झाल्यानंतर मुलीच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसून आला. तिच्या मनात वडिलांविषयी निर्माण झालेल्या कटुतेची तीव्रता कमी होत आहे.

समुपदेशक सरिता (Counsellor Sarita) यांनी समुपदेशन आणखी काही काळ सुरू राहील असे सांगितले. मुलीच्या मनात वडिलांविषयी टोकाची आदराची भावना होती. पण एका घटनेमुळे तिच्या मनात टोकाची कटुता निर्माण झाली. मुलीच्या सामाजिक स्वास्थ्याचा विचार करुन कौटुंबिक न्यायालयाने समुपदेशनाचा पर्याय निवडला आणि त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याची माहिती सरिता यांनी दिली. 

कोरोना संकटामुळे (corona crisis) अद्याप सर्व जण पूर्वीसारखे कामावर जाऊ शकत नाही. शिक्षण संस्थाही सुरू झालेल्या नाही. विद्यार्थी घरात ऑनलाइन शिक्षण घेत आहेत तर अनेक कंपन्यांचे कर्मचारी आजही वर्क फ्रॉम होम करत आहेत. काही ठिकाणी अमूक दिवसाड अशा पद्धतीने मर्यादीत कर्मचाऱ्यांनाच एकावेळी कामावर बोलावले जाते. यामुळे घरी असताना फावला वेळ मजेत घालवण्यासाठी अनेकजण लुडो सारख्या बैठ्या खेळांचा पर्याय निवडत आहेत. भोपाळमध्येही २४ वर्षांची मुलगी आणि तिचे वडील फावला वेळ मजेत घालवण्यासाठी लुडो खेळत होते. पण हा लुडो भलतेच वळण घेत गंभीर झाला. वेळेवर केलेल्या समुपदेशनामुळे परिस्थिती नियंत्रणात येत आहे.

लुडो आणि गुन्ह्यांचे विचित्र कनेक्शन

भारतात लुडो खेळावरुन वाद होऊन वादावादी, मारहाण असे प्रकार घडले आहेत. गुजरातमध्ये (Gujarat) बडोद्यात (Vadodara) ऑनलाइन लुडोमध्ये (ludo) वारंवार झालेला पराभव सहन झाला नाही आणि एका पुरुषाने पत्नीला बेदम मारहाण केली. महिलेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावे लागले. 

.........

काय आहे लुडो?

लुडो हा एक बैठा घरगुती मनोरंजक खेळ आहे. प्रामुख्याने लहान मुलामुलींमध्ये हा खेळ लोकप्रिय असला तरी सर्व वयोगटातील व्यक्ती हा खेळ वेळ मजेत घालवण्यासाठी खेळू शकतात. या खेळासाठी दोन किंवा चार खेळाडू आवश्यक असतात. आता हा खेळ मोबाइलवर खेळणे शक्य आहे. याच कारणामुळे मागील काही वर्षांत लुडो या खेळाच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी