महिला डेंटिस्टने प्रियकराला क्लिनिकमध्ये बोलावून कापलं गुप्तांग, न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 16, 2019 | 20:21 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Woman cut boyfriend's private part: एका महिलेने आपल्या प्रियकराचे गुप्तांग कापल्याप्रकरणी न्यायालयाने तिला शिक्षा सुनावली आहे. ही महिला एक डेंटिस्ट असून तिने प्रियकराला क्लिनिकमध्ये बोलावून त्याचं गुप्तांग कापल

woman cut boyfriend penis private part sex organ lover marriage bengaluru court sentenced crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

बंगळुरू: बंगळुरू येथील एका ४२ वर्षीय डेंटिस्ट महिलेने आपल्या प्रियकराचं गुप्तांग कापलं होतं. प्रियकराचं गुप्तांग कापल्याप्रकरणी बंगळुरू येथील कोरमंगला शहरातील एका न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवलं आहे. तसेच या महिलेला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे, सोबतच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या महिलेचं नाव सईदा अमीना नाहिम असं आहे. पीडित व्यक्तीला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी असंही न्यायालयाने या डेंटिस्टला सांगितलं आहे. 

सईदाचे पीडित व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, प्रियकराने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याने सईदा नाराज झाली होती. नाराज सईदाने २९ नोव्हेंबर २००८ रोजी प्रियकराला आपल्या डेटिंस्टमध्ये बोलावलं आणि त्याचं गुप्तांग कापलं. या प्रकरणी ११ डिसेंबर रोजी न्यायलयाने दिलेल्या निकालात म्हटलं, "पीडित व्यक्तीने आपले वैवाहिक जीवन गमावलं असून त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याची नुकसान भरपाई करण्यासाठी कोणतीही रक्कम पुरेशी ठरणार नाहीये. मात्र, काही रक्कम निश्चित करावी लागेल आणि दंडही वसुल करावा लागेल".

पीडित मीर अरशद अली याला राज्यातील पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फिर्यादींनी न्यायालयाला सांगितले की मीर आणि सईदा यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, नंतर मीरने सईदासोबतचे संबंध तोडले आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न केलं. 

मीर याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याने सईदा चांगलीच संतापली. यानंतर २९ नोव्हेंबर २००८ रोजी सईदाने मीर याला कोरमंगला येथील आपल्या क्लिनिकमध्ये बोलावलं. सईदाने ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकून त्याला पाजलं. मीर बेशुद्ध झाल्यानंतर सईदाने आपल्या क्लिनिकमधील साहित्याच्या सहाय्याने मीरचं गुप्तांग कापलं. यानंतर सईदाने मीर याला रुग्णालयात नेलं आणि तेथून फरार झाली. 

या घटनेनंतर डॉक्टर आणि मीर याच्या परिवाराने सईदाला त्याचं गुप्तांग पुन्हा देण्यास सांगितलं जेणेकरुन पुन्हा सर्जरी करुन ते जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, सईदाने असं करण्यास नकार दिला. सईदाच्या वकिलांनी ती निर्दोष असल्याचा दावा केला होता तसेच मीरचा अपघात झाला आणि त्यात त्याचं गुप्तांग कापलं असंही सांगितलं. चौकशी आणि सुनावणीनंतर न्यायालयाने सईदाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी