महिलेने संन्यासी पतीकडे केली SEXची मागणी आणि मग झालं असं...

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 08, 2020 | 16:49 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

एका महिलेने आपल्या पतीकडे सेक्सची मागणी केल्याने तिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पती आणि सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलाय.

woman demand sex celibate husband thrashed in-laws ahmedabad gujarat domestic violence crime news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे एक विचित्र घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका महिलेने आपल्याच पतीकडे शारीरिक सुखाची (सेक्सची) मागणी केल्याने तिला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी पीडित महिलेचा पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गन्हा दाखल केला आहे. 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, २२ वर्षीय पीडित महिलेने आरोप केला आहे की, जेव्हा-जेव्हा तिने आपल्या पतीकडे लैंगिक संबंधाची (SEX)मागणी केली तेव्हा तिच्या पतीने तिला मारहाण केली.

या घटनेप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "सुरुवातीला माझ्या पतीची वागणूक खूपच चांगली होती. आम्हाला २०१८ साली पहिला मुलगा झाला आणि त्या मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या स्वभावात अचानक बदल झाला". पीडित महिला ही दनिलिम्डा येथील निवासी होती आणि तिचं लग्न सरखेज येथे राहणाऱ्या तरुणासोबत २०१६ साली झालं. 

गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्याने आपल्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास बंद केल्याचा दावा पीडित महिलेना केला आहे. पीडित महिलेने म्हटलं की, "जेव्हा-जेव्हा मी पतीकडे सेक्सची मागणी केली तेव्हा तो रागवायचा, मला शिवीगाळ करुन मारहाण करत असे. आता त्याने दावा केला आहे की त्याने संन्सास स्वीकारला आहे".

रिपोर्ट्सनुसार, पीडित महिलेने आपल्या पतीकडे शारीरिक सुखाच्या मागणीचा आग्रह लावून धरला यानंतर तिचा नवरा घर सोडून गेला. सुनेमुळेच आपला मुलगा घर सोडून गेला असल्याचं सासरच्यांना वाटत त्यामुळे तिच्या सासरच्यांनी तिला मारहाण करणे, त्रास देण्यास सुरुवात केली. 

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने सावकाराकडून कर्ज घेतल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्याने आपल्या मुलाची काळजी घेणेही बंद केले आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या आतड्यांमध्ये संसर्ग झाल्याने तो आजारी पडला मात्र, तेव्हाही पतीने औषधांसाठी पैसे दिले नाहीत असेही तक्रारीत म्हटले आहे. 

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिचा पती आणि सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणाला अटक केलेली नाहीये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी