रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 21, 2019 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Female therapist false allegations on patient: महिला डॉक्टरने एका रुग्णावर केलेला बलात्काराचा गुन्हा तिलाच महागात पडला आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

woman doctor first made physical relations with the patient who came for treatment then accused of rape
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप   |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • रुग्णावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला डॉक्टरला अटक
  • पोलिसांची दिशाभूल प्रकरणी महिला डॉक्टरला होऊ शकते कठोर शिक्षा
  • आरोपी महिला डॉक्टरच्या अडचणीत वाढ 

मिनेसोटा (कॅनडा): कॅनडा येथील मिनेसोटा येथील एका मानसशास्त्रज्ञ महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. एका पुरुष रुग्णासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याच्यावरच बलात्काराचा खोटा आरोप केल्याप्रकरणी या महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. ४३ वर्षीय जोहाना ली लाम हिने एका सेशनदरम्यान रुग्णावर लैंगिक अत्याचार केले. याच प्रकरणात डॉक्टर लाम हिला ११ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. 

जर या प्रकरणात महिला डॉक्टर दोषी आढळली तर तिला १५ वर्षांची शिक्षा आणि ३०,००० डॉलर (म्हणजेच २१.३२ लाख) रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. मिनियापोलिस स्टार ट्रिब्यूनकडून एका तक्रारीनुसार, हा खटला सुरु करण्यात आला आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण ऑगस्ट महिन्यातच सुरु झालं आहे. कारण की, डॉक्टर लाम हिने आपल्यावर पुरुष रुग्णाने तिच्या मिन्टेका येथील कार्यालयात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. याबाबतची तक्रार तिने पोलिसांना फोनवरुन दिली होती. 

लॅम हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन असं म्हटलं आहे की, ती एका वकिलासोबत लग्न करत आहे. त्यामुळे बलात्कार करणारा रुग्ण हा आमच्या दोघांचं अफेअर आहे असाही दावा करेल. असं महिला डॉक्टरने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. जेव्हा पोलिसांनी महिला डॉक्टरकडे आलेल्या रुग्ण व्यक्तीची चौकशी केली तेव्हा त्याने पोलिसांना अशी माहिती दिली की, महिला डॉक्टर आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चार महिन्यांपर्यंत शारीरिक संबंध होते. 

दरम्यान, कोर्टाच्या रेकॉर्डमध्ये रुग्ण व्यक्तीला 'दुर्बल प्रोढ' असं म्हटलं आहे. पीडीत व्यक्तीने याबाबत असं सांगितलं की, महिला डॉक्टरच्या संमतीनेचा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. याच वेळी लॅमने महिला डॉक्टरचे व्हॉईसमेल आणि मेसेज देखील पोलिसांसमोर ठेवले होते. ज्यामुळे महिला डॉक्टर खोटं बोलत असल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी महिला डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे जर महिलेवरील गुन्हा सिद्ध झाल्यास तिला थेट तुरुंगात जावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी