विकृत महिला कुत्र्यासोबत करायची संभोग, स्वत:च्या दोन मुलांचीही केली हत्या 

एका महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पण याचवेळी तिने काही विकृत गोष्टी केल्याचं देखील निदर्शनास आलं आहे.

woman had sexual relations with pet dog killing her two children also
विकृत महिला कुत्र्यासोबत करायची संभोग, स्वत:च्या दोन मुलांचीही केली हत्या   |  फोटो सौजन्य: Twitter

पेन्सिल्वेनिया (अमेरिका): एका महिलेवर तिच्या दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. महिलेने या दोन्हीही मुलांना गळफास दिला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, यानंतर तिने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पाळीव कुत्र्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपही या महिलेवर आहे. ३७ वर्षीय लिसा स्नायडर ही विकृत मनोवृत्तीचं असल्याचंच या सर्व प्रकारावरुन समजतं आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी तिला अटकही केली आहे. 

या प्रकरणाबाबत स्थानिक न्यायालयात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा अनेक रहस्ये उघडकीस आली.  लिसावर असा आरोप केला जात आहे की, ज्या दिवशी तिच्या मुलांचा मृत्यू झाला त्या दिवशी घरात मुलांव्यतिरिक्त फक्त तीच होती. दोन्ही मुलांचा मृतदेह हे गळफास देऊन झाला होता. कुत्र्याच्या गळातील पट्टा काढून मुलांना फाशी देण्यात आली होती. याचवेळी लिसावर असाही आरोप आहे की, ती जबरदस्तीने आपल्या पाळीव कुत्र्याशी संभोग देखील करायची. लिसाच्या फोनवरून काही विचित्र फोटो सापडले आहेत. ज्यात ती तिच्या पाळीव कुत्र्याशी संभोग करत असल्याचं समोर आलं आहे. 

कोर्टात सुनावणीदरम्यान असं म्हटलं आहे की, कुत्र्यासोबत संभोग करताना तिने काही फोटो काढले होते. जे तिने 'डॅडी' नावाच्या एका अज्ञात व्यक्तीला पाठवले होते. लिसा स्नायडरवर प्राथमिकदृष्ट्या हत्या, पुराव्यांसोबत छेडछाड करणे, मुलांवर अत्याचार करणे, कुत्र्यावर अत्याचार आणि जबरदस्ती संभोग करणे. असे अनेक आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, लिसाने हे सगळे आरोप फेटाळून लावले असून आपण निर्दोष असल्याचा दावा तिने कोर्टात केला आहे. सध्या लिसा तुरूंगात आहे. जर या प्रकरणात ती दोषी आढळली तर तिला फाशीची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, कोर्टाच्या नोंदींवरून असे दिसून येते की, मुलांच्या मृत्यूपूर्वी लिसाने 'कार्बन मोनोऑक्साईडमुळे किती वेळात काळ मृत्यू होऊ शकतो.', 'स्वतःला लटकवणं' असे शब्द गुगल सर्च केले होते. या संपूर्ण प्रकारामुळे महिलेच्या कुटुंबीयांना बराच धक्का बसला आहे. सध्या पोलीस मुलांची हत्या नेमकी कशी केली गेली याचा शोध घेत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी