Murder | आधी अनैतिक संबंध, आता करत होती दुर्लक्ष, संतापलेला प्रियकर...चाकू भोसकून महिलेचा खून !

Woman murdered : एका विवाहित महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि विवाहितेमध्ये अनैतिक संबंध होते. आता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तरुणानेच महिलेची हत्या केली होती. आरोपी आणि मृत महिला दोघेही विवाहित होते आणि त्यांच्यात अनैतिक संबंध होते.

Woman Murdered
विवाहबाह्य संबंधांतून महिलेचा खून 
थोडं पण कामाचं
  • एका विवाहित महिलेची चाकूने वार करून हत्या
  • पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली
  • आरोपी आणि विवाहितेमध्ये अनैतिक संबंध होते.

Women murdered in extra marital affair : नवी दिल्ली  : एका विवाहित महिलेची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी २९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि विवाहितेमध्ये अनैतिक संबंध होते. आता ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तरुणानेच महिलेची हत्या केली होती. आरोपी आणि मृत महिला दोघेही विवाहित होते आणि त्यांच्यात अनैतिक संबंध होते. (Woman is murdered in extra marital affair, killer arrested)

आरोपी व्यवसायाने ड्रायव्हर

पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, आरोपीचे नाव भरत असे असून तो सागरपूरचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने ड्रायव्हर असून त्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी सांगितले की त्यांना 22 एप्रिल रोजी नैऋत्य दिल्लीतील सागरपूर येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळाली होती.

अधिक वाचा : धक्कादायक ! हातपाय बांधून विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेचे इस्पितळात निधन

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरती देवी (२८) असे मृत महिलेचे नाव असून ती सागरपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला जखमी अवस्थेत दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आरोपीला पोलिसांनी केली अटक

नैऋत्य दिल्लीचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) मनोज सी यांनी सांगितले की, महिलेच्या पतीच्या वक्तव्याच्या आधारे सागरपूर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराने आरोप केला होता की, भरत नावाच्या व्यक्तीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केले.

अधिक वाचा : Aurangabad : औरंगाबादमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या गटात तुंबळ हाणामारी, 'या' कारणामुळे झाला वाद

डीसीपी म्हणाले की, तांत्रिक पाळत ठेवून, स्थानिक गुप्तचर आणि आमच्या टीमच्या समन्वयित प्रयत्नांच्या मदतीने भरतला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. भरतने चौकशीदरम्यान खुलासा केला की, त्याचे आरतीशी अनैतिक संबंध होते आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती, म्हणून त्याने तिच्यावर वार केले.

अधिक वाचा : पाकिस्तानचा कट फसला; भारतीय तटरक्षक दलाने बोटीतून जप्त केलं 280 कोटींचे हेरॉईन

का केला खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भरत आणि मृत महिला आरती देवी यांच्यात आधी परिचय झाला. नंतर ओळखीचे रुपांतर जवळीकीमध्ये झाले. त्यानंतर आरती देवी आणि भरतमध्ये अनैतिक संबंध तयार झाले. भरत हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे. भरत विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. खून झालेली आरती देवी देखील विवाहित होती. काही दिवस अनैतिक संबंध ठेवल्यानंतर आरती देवीने भरतकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात केली. यामुळे भरत चिडला. भरतच्या आग्रहाला आरती देवी प्रतिसाद देत नसल्यामुळे आणि आधी अनैतिक संबंध ठेवून आता दुर्लक्ष करत असल्यामुळे भरतचा आरती देवीवर राग होता. यातूनच त्याने रागाच्या भरात आरती देवीचा खून केला. आरती देवीच्या पतीने भरतने आपल्या पत्नीवर चाकूने वार केल्याची तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी माग काढत भरतला शोधून काढले आणि त्याला अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी