महिलेने घरात पाळले ४०० विषारी कोळी

woman kept 400 poisonous spiders at her home : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या २८ वर्षांच्या बेथनी स्टेपल्स नावाच्या महिलेने घरात ४०० विषारी कोळी पाळले आहेत.

woman kept 400 poisonous spiders at her home
महिलेने घरात पाळले ४०० विषारी कोळी 
थोडं पण कामाचं
  • महिलेने घरात पाळले ४०० विषारी कोळी
  • २८ वर्षांच्या बेथनी स्टेपल्स नावाच्या महिलेने घरात ४०० विषारी कोळी पाळले
  • छंद म्हणून बेथनीने विषारी कोळी पाळले

woman kept 400 poisonous spiders at her home : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या २८ वर्षांच्या बेथनी स्टेपल्स नावाच्या महिलेने घरात ४०० विषारी कोळी पाळले आहेत. छंद म्हणून बेथनीने विषारी कोळी पाळले आहेत. पाळलेले कोळी एवढे विषारी आहेत की त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यापासून बेथनीच्या घरी जाणे तिच्या सर्व नातलगांनी थांबविले आहे. 

बेथनीकडे १५० वाढीच्या अंतिम टप्प्यातले प्रौढ कोळी आहेत. तसेच बेथनीकडे २५० बाल्यावस्थेतील विषारी कोळी आहेत. काचेच्या सुरक्षित भांड्यांमधून बेथनीने शास्त्रोक्त पद्धतीने विषारी कोळी पाळले आहेत. एखाद्या प्रयोगशाळेत ज्या पद्धतीने कोळी काचेच्या भांड्यांमध्ये किंवा पेट्यांमध्ये ठेवले जातात तशाच पद्धतीने बेथनी कोळी सांभाळत आहे. 

कोळी या प्राण्याविषयीची मनातील भीती दूर करण्याच्या हेतूने बेथनीने कोळी पाळण्याचा छंद जोपासला. या छंदापोटीने बेथनीने ४०० विषारी कोळी पाळले आहेत. आता बेथनीला कोळ्यांची भीती वाटत नाही. पण तिच्या घरातले कोळी पाहून इतरांना भीती वाटू लागली आहे. शेजारी पण तिच्या घरी येणे टाळू लागले आहेत. 

बेथनी म्हणाली की तिने पहिला कोळी २०२० मध्ये पाळायला सुरुवात केली आणि २०२१ पासून घरातच कोळ्यांची पैदास व्हावी यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने ब्रीडिंगचे प्रयोग सुरू केले.

थायलंडमध्ये टारेंटयुला विषारी कोळ्यांचे अनेक प्रकार आढळतात. जगात टारेंटयुला विषारी कोळ्यांच्या लाखभर प्रजाती आहेत. यापैकी निवडक प्रजाती घरात पाळल्याचे बेथनीने सांगितले. कोळ्यांना नियमितपणे किडे आणि झुरळे खाद्य म्हणून देते असेही बेथनीने सांगितले. विषारी कोळ्यांव्यतिरिक्त बेथनीच्या घरात निवडक विंचू, पाली, कुत्रा आणि मीलीपेड आहेत. हे सर्व बेथनीने पाळले आहेत. पाळलेल्या सर्व प्राण्यांना नियमित खाणे खाऊ घालण्यातच तिचे रोजचे काही तास खर्ची होतात. ज्या प्राण्यांच्या देखभालीचा खर्च मर्यादीत आहे असेच प्राणी पाळत असल्याचे बेथनीने सांगितले. 

टारेंटयुला विषारी कोळ्यांच्या देखभालीवर जास्त खर्च होत नाही. यामुळेच मोठ्या संख्येने टारेंटयुला विषारी कोळी पाळणे सहज शक्य असल्याचे बेथनी म्हणाली. प्राणी पाळणे आणि त्यांना खाऊ घालणे यात आनंद मिळतो आणि त्या आनंदासाठीच मी प्राणी पाळत आहे. कोणालाही त्रास देणे हा त्या मागचा उद्देश नाही; बेथनीने सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी