Murder : साहेब, आत्ताच नवऱ्याचा खून करून आलेय! 7 वर्षांच्या मुलासोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली महिला

दारुड्या पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलेनं त्याचा खून केला आणि पोलीस ठाण्यात समर्पण केले.

Murder
साहेब, आत्ताच नवऱ्याचा खून करून आलेय!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महिलेनं केला पतीचा खून
  • मुलासमोर संपवले पतीचे जीवन
  • पोलिसांत केले समर्पण

Murder : आपल्या पतीचा निर्घृण खून (Murder of husband) करून एक महिला पोलीस ठाण्यात (Police station) पोहोचली. तिच्यासोबत तिचा सात वर्षांचा मुलगाही (Seven year old son) होता. आपण आपल्या पतीचा खून केला असून त्याचा मृतदेह (Dead body) घरात पडला आहे, असं तिनं सांगितलं. सुरुवातीला पोलिसांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र तिच्या लहान मुलानेही पोलिसांना हेच सांगितल्यावर पोलीस तिला घेऊन तिच्या घरी गेले. तिथे त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसला आणि पोलिसांनाही धक्का बसला. 

अशी घडली घटना

उत्तर प्रदेशमधील जालौन परिसरात राहणाऱ्या संदीपचं दहा वर्षांपूर्वी संध्या नावाच्या महिलेसोबत लग्न झालं होतं. संसाराची सुरुवातीची वर्ष सुखात गेल्यानंतर त्यांच्यात भांडणं व्हायला सुुरवात झाली होती. त्यांना सात वर्षांपूर्वी एक मुलगाही झाला होता. त्यानंतर मात्र संदीपचं वागणं बदलत गेलं. संदीपला दारुचं व्यसन जडलं आणि दिवसेंदिवस हे व्यसन वाढत गेलं. दररोज दारू पिऊन घरी येणारा संदीप बायको आणि मुलाला मारहाण करत होता. त्याची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न संध्याने वारंवार केले. अनेकदा नातेवाईकांना बोलावून ही समस्या त्यांच्या कानावर घातली आणि त्यांच्याकरवी संदीपची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे संदीप अधिकच बिथरला आणि त्याचं दारू पिऊन मारहाण करण्याचं प्रमाण वाढतच गेलं. 

राग अनावर

बायको आणि मुलाला दारुच्या नशेत मारहाण करणारा संदीप घटनेच्या दिवशीदेखील दारु पिऊन आला होता. त्याने बायकोसोबत भांडण केलं आणि दोघांना मारहाण करून तो झोपी गेला. मात्र रोजच्या त्रासाला वैतागलेल्या संध्याच्या डोक्यात त्याच्याविषयीचा राग दाटून आला होता. तिने घरातील कुऱ्हाड उचलली आणि झोपेतच संदीवर वार केले. काही वार वर्मी बसल्याने झोपेतच संदीपचा मृत्यू झाला. 

अधिक वाचा - Smallest Country : दोन खांबांवर वसलेला सर्वात छोटा देश, राहतात फक्त 27 लोक

मुलादेेखत केला खून

ही घटना घडली तेव्हा सात वर्षांचा मुलगाही जागा होता आणि ही घटना उघड्या डोळ्यांनी पाहत होता. आपल्या आईला वडिलांनी रोज रोज त्रास दिल्यामुळेच आईने हे कृत्य केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. आपले वडील रोज रोज आपल्याला दारू पिऊन मारहाण करत असत. आपल्या आईलादेखील ते रोज शिव्या द्यायचे आणि तिला मारायचे, अशी माहिती या सात वर्षांच्या मुलाने पोलिसांत दिली आहे. त्यामुळेच आपल्या आईने वडिलांचा खून केल्याचं त्याने म्हटलं आहे. 

अधिक वाचा - Breaking News 02 August 2022 Latest Update : दिवसभरातील घडामोडी, जाणून घ्या कुठे काय घडलं

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी संदीपचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. या प्रकरणी आरोपी संध्याला पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आता संध्याला शिक्षा होईलच. मात्र त्यांच्या सात वर्षांच्या मुलाचे पुढे काय होणार, या विचाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी