Online Fraud : ऑनलाइन फर्निचर विकणे पडले महागात, फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून लंपास केली 3 लाखांहून अधिक रक्कम

Online Fraud : अलीकडच्या काळात ऑनलाइन फ्रॉडमध्ये (Online Fraud) मोठीच वाढ झाली आहे. फसवणूक करणारे नवनवीन पद्धतींद्वारे सर्वसामान्यांना गंडा घालत आहेत. असाच एक थक्कादायक प्रकार घडला आहे. फर्निचरची ऑनलाइन विक्री (Online furniture selling)करणे एका महिलेला महागात पडले आहे. या फक्त 21 हजारांच्या व्यवहारात या महिलेचे 3.77 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रकरण मुंबईत घडले आहे. एक महिला ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली आहे.

Cyber crime
सायबर फ्रॉडपासून सावधान 
थोडं पण कामाचं
  • फसवणूक करणारे नवनवीन पद्धतींद्वारे सर्वसामान्यांना गंडा घालतात
  • फर्निचरची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला लाखांचा गंडा
  • फसवणूक करणाऱ्याने फर्निचर खरेदी करण्याची ऑफर देत केला फ्रॉड

Online Fraud : नवी दिल्ली : अलीकडच्या काळात ऑनलाइन फ्रॉडमध्ये (Online Fraud) मोठीच वाढ झाली आहे. फसवणूक करणारे नवनवीन पद्धतींद्वारे सर्वसामान्यांना गंडा घालत आहेत. असाच एक थक्कादायक प्रकार घडला आहे. फर्निचरची ऑनलाइन विक्री (Online furniture selling)करणे एका महिलेला महागात पडले आहे. या फक्त 21 हजारांच्या व्यवहारात या महिलेचे 3.77 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हे प्रकरण मुंबईत घडले आहे. एक महिला ऑनलाइन फसवणुकीची बळी ठरली आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, 26 वर्षीय महिला एका ऑनलाइन पोर्टलवर फर्निचरची विक्री करत असताना एका फसवणूक करणाऱ्याने तिला 21,000 रुपयांना फर्निचर खरेदी करण्याची ऑफर दिली. त्यानंतर पैसे देण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेची फसवणूक करून तिच्या बँक खात्यातून 3.77 लाख रुपये काढून घेतले. (Woman lost Rs 3.77 lakhs in online fraud while selling furniture)

अधिक वाचा : अरे देवा ! आता आणखी एक सापडला नवीन सब-वॅरिएंट.... WHO ने भारताला केले अलर्ट

हा प्रकार घडल्यानंतर संबंधित महिलेने मंगळवारी उपनगरीय मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तो पुढे म्हणाला, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) इमारतीत राहणारी पीडित महिला एका पेट्रोलियम कंपनीत कार्यकारी सहाय्यक आहे.

अशी झाली फसवणूक 

"अलीकडेच महिलेला आपल्या वरिष्ठांचा फोन आला की त्याला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 21,000 रुपये किंमतीचे फर्निचर विकायचे आहे. त्यानंतर, तिने वस्तू विकण्यासाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केली. लवकरच, एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्याशी संपर्क साधला आणि फर्निचर खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले. त्यानंतर, पैसे देण्याच्या बहाण्याने, आरोपीने तिच्या बँक खात्याचे तपशील मिळवले आणि तिच्या खात्यातून 3.77 लाख रुपये काढले."

अधिक वाचा : CM एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदी-शहांशी करणार चर्चा; फडणवीसांसाठी धोक्याची घंटा?

सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून पैसे गमावल्यानंतर पीडितेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितले. आरोपींविरुद्ध फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

एका वेगळ्या प्रकरणात, नोएडामधील एका व्यक्तीचे 4.50 लाख रुपयांचे नुकसान झाले. नोएडामधील एका व्यक्तीने क्रेडिट कार्डवर रोख पॉइंट रिडीम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला 4.50 लाख रुपयांचे नुकसान झाले. किंबहुना, क्रेडिट कार्डवर कॅश पॉइंट रिडीम करण्याच्या किफायतशीर ऑफरसाठी नोएडातील एका व्यक्तीला बँकेचे प्रतिनिधी म्हणून दाखवलेल्या सायबर गुन्हेगारांकडून 4.50 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.

अधिक वाचा : नामांकित स्कूलमध्ये मोठी दुर्घटना ! मधल्या सुट्टीत डब्बा खाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडले झाड, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर अनेकांची प्रकृती चिंताजनक

अलीकडेच सायबर गुन्हेगारांनी अभिनेता सोनू सूदकडे मदत मागणाऱ्या एका रुग्णाचीदेखील फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बॉलीवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)आपल्या समाजसेवी कामांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक गरजवंत सोनू सूदकडे मदतीची मागणी करत असतात. किंवा मदत करण्यासाठी सोनू सूदला हाक घालत असतात. मात्र एक अतिशय विचित्र घटना यासंदर्भात घडली आहे. एका आजारी शिक्षकाने (Ill Teacher)अभिनेता सोनू सूदची उपचारासाठी मदत मागितली. मात्र या सर्व प्रकारात त्या शिक्षकाला चांगलाच फटका बसला आहे. सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) शिक्षकाचे बँक खाते रिकामे केले. हे प्रकरण बिहारीमधील नालंदा जिल्ह्यातील शहर पोलीस स्टेशन द्वारका नगर परिसरात घडले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी