धक्कादायक ! पती आणि कुटुंबाला व्हिडिओ मेसेज करुन महिलेची आत्महत्या

woman sends video message and commits suicide: एका महिलेने आपल्या पती आणि कुटुंबाला व्हिडिओ मेसेज करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

Representational Image
प्रातिनिधीक फोटो (फोटो सौजन्य: iStockimages) 

हैदराबाद : एका २० वर्षीय महिलेने २९ मार्च रोजी हैदराबादमध्ये कथितपणे आपले आयुष्य संपवले. महिलेने हे टोकाचं पाऊल उचण्यापूर्वी आपला पती आणि कुटुंबीयांना एक व्हिडिओ मेसेज पाठवला होता. हा व्हिडिओ मेसेज पाठवून कुटुंबातील सदस्यांना आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होत. 
मृतक महिलेचं नाव ऐश्वर्या असल्याची माहिती समोर आली आहे. तिने हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात कथितपणे आत्महत्या केली. ऐश्वर्या ही पीजी मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी केला होता विवाह

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऐश्वर्या आणि अशर हे दोघे एकमेकांना इंस्टाग्रामवर भेटले. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध बनले. २०१९ मध्ये ऐश्वर्या अंडरग्रॅज्युएट नर्सिंग कोर्स करत होती. २० फेब्रुवारी २०२० मध्ये या दोघांनी आपल्या परिवाराला कुठलीही कल्पना न देता एका मंदिरात विवाह केला. या दोघांनी लग्न केल्याची माहिती मिळताच दोघांच्याही कुटुंबातील ज्येष्ठांनी त्यांच्या भविष्याच्या संदर्भात चर्चा केली. दोघांकडेही उत्पानाचे ठोस साधन नसल्याने ऐश्वर्याला तिच्या परिवाराकडे पुन्हा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गेल्यावर्षी जुलै महिन्यात या महिलेला एका रुग्णालयात नोकरी मिळाली आणि तेव्हापासून ती एका हॉस्टेलमध्ये राहू लागली. या दरम्यान ऐश्वर्या आणि आशर यांनी पुन्हा एकमेकांना भेटण्यास सुरुवात केली. 

यावर्षी जानेवारी महिन्यात, ऐश्वर्या एक बिझनेस एक्झिक्युटिव्ह म्हणून एका कंपनीत जॉईन झाली. त्यानंतर ती अशरसोबत एका भाड्याच्या खोलीत राहू लागली. आशेर आपल्या आई-वडिलांकडे गेल्यानंतर ती पुन्हा पीजी मध्ये राहण्यास गेली. कथितपणे ऐश्वर्या दोन वेळा गर्भवती झाली आणि तिचा गर्भपात झाला.

आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवण्यापूर्वी ती अशरच्याघरी गेली आणि आपल्या लग्नाची घोषणा करण्यासाठी एका समारोहाचं आजोजन कराल का असे विचारले. त्यावेळी अशरने तिला दोन वर्षे थांबण्यास सांगितले. यानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी