फोनवर बोलता-बोलता महिला सापांच्या जोडीवर बसली आणि मग...

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 12, 2019 | 19:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

स्मार्टफोनच्या नादात आतापर्यंत अनेक अपघात घडल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण आता एक विचित्र घटना समोर आली आहे. एक महिला फोनवर बोलता-बोलता सापाच्या जोडीवर बसली. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे ही विचित्र घटना घडली आहे.

Snake bite woman while speaking on phone
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • स्मार्टफोनच्या नादात महिला सापावर बसली
  • उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे घडली घटना
  • सापांच्या जोडीवर बसलेल्या महिलेला सर्पदंश

गोरखपूर: आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाच्याच हातात आता स्मार्टफोन पहायला मिळतात. याच स्मार्टफोनच्या नादात अनेक अपघातही घडतात. आता असाच एक प्रकार उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे घडला आहे. फोनवर बोलण्याच्या नादात एक महिला सापांच्या जोडीवरच बसली आणि त्यानंतर अवघ्या काही वेळातच या महिलेचा मृत्यू झाला. गोरखपूरमधील रियांव गावात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमध्ये काम करणारे जय सिंह यादव यांच्या घरात सापांची एक जोडी शिरली होती. हे साप घरातील बेडवर होते. त्याच दरम्यान जय सिंह यादव यांची पत्नी फोनवर बोलण्याच्या नादात सापांच्या जोडीवर बसल्या. बेडवर प्रिंटेड बेडशीट असल्याने त्यांना साप दिसले नाहीत. गीता फोनवर बोलत बोलत बाहेरून घरात आली आणि बेडवर बसली. 

गीता सापांवर बसल्याने तिला त्या सापांनी चावा घेतला. सर्पदंश झाल्याने त्या अवघ्या काही मिनिटांतच बेशुद्ध झाल्या. या घटनेनंतर परिवारातील इतर सदस्यांनी त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. गीता यांच्यावर उपचार सुरू होते मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गीता यांचे नातेवाईक रुग्णालयातून घरी परतले तेव्हा सुद्धा त्या सापांची जोडी बेडवरच होती. त्या सापांना पाहून शेजाऱ्यांनी त्या सापांना मारुन टाकलं.

बिहारमध्ये घडली होती वेगळीच घटना

काही दिवसांपूर्वी बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील प्रतापगढ येथे एक आश्चर्यकारक घटना घडली होती. एका विषारी सापाने ज्या व्यक्तीला दंश केला तो व्यक्ती सुखरूप असून त्या सापाचाच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुखानगर गावात राहणआरे सुबोध प्रसाद सिंह हे बाग काम करण्यासाठी बागेत पोहोचले तेव्हा त्यांना सर्पदंश झाला यानंतर चक्क सापाचाच मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...