Shocking! पैसे वाचवण्याच्या नादात महिलेची गेली इज्जत; चालत्या गाडीत तासनतास होत राहिला बलात्कार...

Rape in chittorgarh :राजस्थानच्या चित्तोडगडमधून एक अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. जिथे एका व्यावसायिकाने महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर त्याने चालत्या वाहनात तासनतास तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडितेला बेशुद्ध करून रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.

Woman was raped and thrown naked in a car
Shocking! पैसे वाचवण्याच्या नादात महिलेची गेली इज्जत; चालत्या गाडीत तासनतास होत राहिला बलात्कार... ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पैसे वाचवण्याच्या नादात महिलेसोबत झालं वाईट घटना
  • कारमधून लिफ्ट मागणे पडले महागात
  • व्यावसायिकाने कारमध्ये बलात्कार करून दिले फेकून

Crime news . राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यात विवाहितेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेसोबत गॅस एजन्सी चालकाने हा बलात्कार केला आहे. प्रवासासाठी केवळ काही रुपये वाचवण्यासाठी ही विवाहित महिला गॅस एजन्सीचालकाच्या गाडीत बसली. याचा फायदा घेत गॅस एजन्सीचालकाने विवाहितेला आपल्या वासनेची शिकार बनवले. (Woman was raped and thrown naked in a car)

अधिक वाचा : Abdul Sattar: कृषीमंत्र्यांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ, पन्नास खोके... एकदम ओक्केवरून अब्दुल सत्तार चिडले

पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहेकी, ती काही कामासाठी चित्तौडगडहून कापसानला जात होती. दरम्यान, ती कापसनकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीची वाट पाहत वाटेत उभी होती. याचदरम्यान गॅस एजन्सीचालक केशुराम तिथे कार घेऊन आला. पिडित महिला त्याला अगोदरपासूनच ओळख होती. त्याने त्या महिलेला ती कुठे जात आहे असे विचारले. त्यावर तिने कपासनकडे जात असल्याचे सांगितले.

अधिक वाचा : Raigad accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर पलटी, अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम, VIDEO

केशुराम म्हणाला की, तो कापसनच्या दिशेने जात आहे. तुम्हीही चला मी रस्त्यात सोडतो. विवाहित महिलेने प्रथम जाण्यास नकार दिला, परंतु त्यानंतर केशुरामने सांगितले की, जर ती त्याच्यासोबत गेली तर पैसे वाचतील. म्हणून ती गाडीत बसली. कार काही अंतर गेल्यानंतर केशुरामने रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये गाडी थांबवली. इथून ज्यूसची दोन पाकिटे घेतली. महिलेने ज्यूस प्यायला लागताच ती बेशुध्द पडली होती. सुमारे 3 ते 4 तासांनंतर तिचे डोळे उघडले तेव्हा ती एका मोकळ्या मैदानाकडे विना कपड्यांची पडली होती, जिच्या प्रायव्हेट पार्टला प्रचंड वेदना होत होत्या. येथून विवाहितेने प्रथम तिच्या घरी जाऊन पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी