Divorce | पत्नीला पोलिसात नोकरी मिळताच छळ करणाऱ्या पतीचे बदलले मन, कोर्टाने म्हटले पत्नीला समजतो कामधेनु गाय

Women | महिलेने या आधारावर घटस्फोट मागितला होता की पती बेरोजगार आहे, दारुड्या आहे आणि तिचा शारीरिक छळ करतो. पैशांची मागणीदेखील करतो. या प्रकरणातील महिला आणि पुरुष दोघेही गरीब पार्श्वभूमीचे होते. लग्न झाले तेव्हा पती आणि पत्नी अनुक्रमे १९ वर्षे आणि १३ वर्षांचे होते. २००५ मध्ये सज्ञान झाल्यानंतरदेखील पतीने पत्नीला २०१४ पर्यत सासरी नेले नाही.

Woman Got divorce
घटस्फोट 
थोडं पण कामाचं
  • मानसिक क्रौर्याच्या आधारावर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका दांपत्याच्या घटस्फोटाला (Divorce)मंजूरी
  • दिल्ली पोलिसात (Delhi Police) नोकरी मिळाल्यानंतरच त्याचा पत्नीसोबत राहण्यातील रस वाढला
  • पती बेरोजगार आहे, दारुड्या आहे आणि तिचा शारीरिक छळ करतो

Women | नवी दिल्ली:  पतीकडून होत असलेला छळ आणि मानसिक क्रौर्याच्या आधारावर दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका दांपत्याच्या घटस्फोटाला (Divorce)मंजूरी दिली आहे. कोर्टाने म्हटले आहे की संबंधित व्यक्ती आपल्या पत्नीला कामधेनू गाय समजते आणि दिल्ली पोलिसात (Delhi Police) नोकरी मिळाल्यानंतरच त्याचा पत्नीसोबत राहण्यातील रस वाढला. न्यायमुर्ती विपिन सांघी आणि न्यायमुर्ती जसमीत सिंह यांच्या बेंचने म्हटले की कोणत्याही भावनात्मक संबंधाशिवाय पतीकडून पत्नीशी ठेवण्यात आलेल्या भौतिकवादी दृष्टीकोनातून पत्नीला जो मानसिक त्रास आणि छळ याला सामोरे जावे लागले असेल ते तिच्यासोबत झालेल्या क्रौर्य दाखवण्यासाठी पुरेसे आहे. (Divorce : After wife got job in police, husband changed his mind, but court granted the divorce)

दिल्ली उच्च न्यायालयाच्या बेंचने पुढे म्हटले की सर्वसाधारणपणे प्रत्येक विवाहित महिलेची इच्छा असते की संसार करावा, कुटुंब वाढवावे. अर्थात या प्रकरणात असे दिसते की पतीला लग्न, संसार इत्यादी गोष्टींमध्ये अजिबात रस नाही, त्याला फक्त पत्नीच्या उत्पन्नातच रस आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मॅरिज कोर्टाने दिलेला आदेश रद्द करत घटस्फोटाचा आदेश दिला. त्यामुळे या पती पत्नीत घटस्फोटात घडून आला.

काय होते प्रकरण

महिलेने या आधारावर घटस्फोट मागितला होता की पती बेरोजगार आहे, दारुड्या आहे आणि तिचा शारीरिक छळ करतो. पैशांची मागणीदेखील करतो. या प्रकरणातील महिला आणि पुरुष दोघेही गरीब पार्श्वभूमीचे होते. लग्न झाले तेव्हा पती आणि पत्नी अनुक्रमे १९ वर्षे आणि १३ वर्षांचे होते. २००५ मध्ये सज्ञान झाल्यानंतरदेखील पतीने पत्नीला २०१४ पर्यत सासरी नेले नाही. मात्र पत्नीला दिल्ली पोलिसात नोकरी लागताच पतीचा पत्नीविषयी दृष्टीकोन बदलला.

कोर्टाचा शेरा

कोर्टाने या प्रकरणात म्हटले आहे की असे दिसते की पतीने आपल्या पत्नीला फक्त कामधेनू गाय समजले होते. दिल्ली पोलिसात नोकरी मिळाल्यानंतरच पतीचा पत्नीमधील रस वाढला. पतीच्या या वर्तवणुकीमुळे पत्नीला मानसिक छळाला सामोरे जावे लागले. पतीचा पत्नीशी असणारा दृष्टीकोन हा भौतिकवादी होता. तिच्यावर दाखवण्यात आलेले क्रौर्य यातून स्पष्ट होते.

पतीला नको होता घटस्फोट

पतीने या घटस्फोटाला विरोध केला होता. त्याने म्हटले होते की त्याने महिलेला शिक्षण देण्याचा खर्च केला त्यामुळेच तिला नोकरी मिळाली. यावर कोर्टाने म्हटले की पत्नी २०१४ पर्यत आपल्या आईवडिलांकडेच असल्याने तिचा सर्व खर्च तिच्या आई वडिलांनीच केला असणार. यातून ही बाब स्पष्ट होते. एरवी पत्नी नको असणाऱ्या या व्यक्तीला त्या महिलेशी संसार करण्यास रस नव्हता. मात्र तिला नोकरी मिळताच या व्यक्तीला पत्नीमध्ये रस निर्माण झाला होता. न्यायालयाने या बाबीची दखल घेत घटस्फोट मंजूर केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी