Women Physical relationship with bf : मुलांना गाडीबाहेर काढून बॉयफ्रेंडसोबत करत होती नको 'ते', पोलिसांकडून अटक

women had Physical relationship with bf एका आईने आपल्या दोन मुलांना गाडीबाहेर काढले आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करायला सुरूवात केली. दोन्ही मुलं गाडीबाहेर ताटकळत उभी होती, परंतु त्या आईने आपल्या मुलांना गाडीत घेतले नाही.

car
मुलांना गाडीबाहेर काढून आई बॉयफ्रेंडसोबत करत होती नको 'ते' 
थोडं पण कामाचं
  • एका आईने आपल्या दोन मुलांना गाडीबाहेर काढले
  • आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करायला सुरूवात केली.
  • दोन्ही मुलं गाडीबाहेर ताटकळत उभी होती.

Women  Physical relationship with bf : अर्जेटिना :  एका आईने आपल्या दोन मुलांना गाडीबाहेर काढले आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला सुरूवात केली. दोन्ही मुलं गाडीबाहेर ताटकळत उभी होती, परंतु त्या आईने आपल्या मुलांना गाडीत घेतले नाही. पोलिसांना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा आई आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. (women had  Physical relationship with bf in car children forced to stand outside )

अर्जेंटिनामध्ये ही विचित्र घटना समोर आली आहे.  रस्त्यात महिलेने आपली गाडी थांबवली. तिने आपल्या पाच वर्षाच्या मुलीला आणि दोन वर्षाच्या मुलाला गाडीबाहेर काढले. त्यानंतर गाडीत असलेल्या आपल्या प्रियकरासोबत तिने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरूवात केली. बाहेर असलेली मुलं कावरीबारी झाली. त्यांनी आपल्या आईला हाक मारण्यास सुरूवात केली. मुलं गाडीवर हात मारत होती आणि आईला आवाज देत होती. पण त्यांची आई ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हवी. मुलांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न केला, परंतु गाडी आतून लॉक होती म्हणून गाडीचा दरवाजा उघडलाच नाही. घाबरलेली मुलं काचेतून आईला शोधण्याचा प्रयत्न करत होती. 

थोड्या वेळाने तिथून पोलीस जात होते, त्यांना काहीतरी विचित्र जाणवल्यांनी गाडीच्या दरजावाजावर थाप मारली. तेव्हा महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत होती. मुलांना बाहेर काढून दोघे रोमान्स करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तेव्ह पोलिसांनी तत्काळ दोघांना ताब्यात घेतले. मुलांच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. आपण या महिलेला काही दिवसांपूर्वीच भेटल्याचे त्याने सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी