Crime News | नवी दिल्ली : पोलिस अधिकारी (Young Lady Officer) असलेल्या एका तरूणीने आपल्या होणाऱ्या पतीलाच अटक (Arrest) करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान ही घटना आसाममधील गुवाहाटीमध्ये घडली आहे. आपला होणारा नवरा आपली फसवणूक करून लग्नाच्या बेडीत अडकवत असल्याचे कळताच महिला पोलिसाने ठग असलेल्या तरूणाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास केल्यानंतर (Police Investigation) सर्वप्रथम संबधित तरूणाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. (women Police in Assam have arrested her fiance).
अधिक वाचा : पुतण्याने काकाच्या नावावर काढले १६ लाखांचे कर्ज
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी कोर्टात आरोपी तरूणाला कोर्टात आणण्यात आले. या आरोपीला आता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वास्तविक झाले असे की हा तरूण आपली ओळख लपवून पोलिस अधिकारी महिलेला लग्नाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र या आधीच महिला पोलिसाने आपली सिंघमगिरी दाखवत तरूणाचा भांडाफोड केला आहे.
हा धक्कादायक प्रकार आसाममधील नगांव या जिल्ह्यात घडला आहे. जोनमणी राभा ही तरूण पोलिस अधिकारी नगांव ठाण्यात पोस्टींगवर कार्यरत होती. लक्षणीय बाब म्हणजे राणा पगग असे अटक झालेल्या तरूणाचे नाव आहे. या राणा पगग महिला पोलिस अधिकाऱ्याला फसवणूक करून लग्नाच्या जाळ्यात अडकवत असल्याची चाहूल त्या तरूणीला लागली. त्याअनुशंगाने तिने तपास चालू केला. या तपासाच्या अंती तरूणाने फसवणूक करून आठ लाख रूपयांची रक्कम वसूल केल्याचेही समोर आले. त्यामुळे या तरूणाला अटक करण्यात आली आहे. आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली.
आसामधील तरूण महिला पोलिस अधिकारी जोनमणी राभा यांची २०२१ मध्ये माजुलीमध्ये पोस्टिंग झाली होती. त्या दरम्यान आरोपी पगग स्वत:ला ओएनजीसीचा पीआरओ म्हणजेच जनसंपर्क असल्याचा दावा करत होता. पुढे या दोघांमध्येही संपर्क वाढत गेला. कालांतराने पगगने जोनमणी यांच्याकडे लग्नाची मागणी घातली. जोनमणी या तरूणी पोलिस अधिकारी असलेल्या महिलेनेही लग्नाला होकार दिला. २ ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांचा साखरपुडा देखील पार पडला. २०२२ मध्ये लग्न करणार असल्याचे निश्चित झाले होते. तसेच नोव्हेंबर २०२२ मध्ये लग्न करण्याच मुहूर्तही निघाला होता. पण त्याआधीच हे लग्न मोडले आहे.
२०२२ च्या सुरूवातीलाच पगग याच्यावर या तरूण महिला पोलिस अधिकाऱ्यांचा संशय वाढत चालला होता. कारण स्वत:ला ओएनजीसीचा पीआरओ सांगणाऱ्या पगगने कंत्राट देण्याच्या नावाखाली २५ लाख रूपयांची फसवणूक केली. वास्तविक जोनमणी यांनीही पीआर आणि एडव्हरटाईजमेन्टची पदवी घेतलेली आहे. त्यामुळे जोनमणी यांचा संशय अधिक बळावला. मग चौकशीला सुरूवात केल्यानंतर सत्य बाहेर आले.
आरोपी पगग हा एक एसयूव्ही वापरत होता आणि त्याने त्याचा बॉडीगार्ड देखील ठेवला होता. पण हा सगळा फक्त देखावा होता. हे चौकशीतून समोर आले. यानंतर पगगविरोधात जोनमणी यांनी कडक कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पगगवर आता फसवणूक, खोटी कागदपत्रे देणे, लोकांकडून पैसे लाटणे, अशे विविध प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान जो चुकीचे कृत्य करेल त्याला मी सोडणार नाही असे या महिला पोलिस अधिकाऱ्याने म्हटले.