पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही

Won’t recognise Pakistani degrees say UGC and AICTE : पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही असे यूजीसी आणि एआयसीटीई यांनी परिपत्रक काढून जाहीर केले

Won’t recognise Pakistani degrees say UGC and AICTE
पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही
  • यूजीसी आणि एआयसीटीई यांनी परिपत्रक काढून जाहीर केले
  • पाकिस्तानमधील डिप्लोमा, डीग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डीग्री अशा शिक्षणाला भारतात मान्यता नाही

Won’t recognise Pakistani degrees say UGC and AICTE : नवी दिल्ली : पाकिस्तानच्या डीग्रीला भारतात मान्यता नाही असे यूजीसी (University Grants Commission - UGC) आणि एआयसीटीई (All India Council for Technical Education - AICTE) यांनी परिपत्रक काढून जाहीर केले आहे. भारतीय नागरिकाने पाकिस्तानमध्ये जाऊन घेतलेल्या डिप्लोमा, डीग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डीग्री अशा शिक्षणाला भारतात मान्यता नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून येऊन भारताचे नागरिकत्व घेतलेल्यांपैकी ज्यांनी पाकिस्तानमध्ये शिक्षण उच्च शिक्षण घेतले असेल त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या लेखी परवानगी नंतरच संबंधित शैक्षणिक प्रमाणपत्राचा वापर नोकरी आणि व्यवसायासाठी करता येईल; असेही यूजीसी आणि एआयसीटीई यांनी जाहीर केले आहे. भारतीय नागरिकांनी पाकिस्तानमध्ये जाऊन शिक्षण घेऊ नये कारण पाकिस्तानमधील डिप्लोमा, डीग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट डीग्री अशा शिक्षणाला भारतात मान्यता नाही; असेही यूजीसी आणि एआयसीटीई यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची 'टीचर सेना'

युक्रेनमध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलांची लढाईमुळे पंचाईत झाली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन परिपत्रक काढल्याचे यूजीसी आणि एआयसीटीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानधील सध्याची स्थिती बघता तिथे शिक्षण घेण्यासाठी अडचणीचे ठरू शकते. यामुळेच परिपक काढून विद्यार्थ्यांना सावध केल्याचे यूजीसी आणि एआयसीटीईने सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सुरक्षेशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दिलेल्या सूचनेनंतर यूजीसी आणि एआयसीटीईने विद्यार्थी हिताचा विचार करुन परिपत्रक काढले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी