Panna Diamond Mine: खाणीतून सापडला जबरदस्त हिरा आणि हा मजूर रातोरात झाला करोडपती, थक्क करणारी किंमत...

Diamond Mine News : असे म्हणतात की जेव्हा योग जुळून येतात तेव्हा नशीबाचे दरवाजे एका झटक्यात खुले होतात आणि माणसाची परिस्थितीच बदलून जाते. भोपाळमध्ये याचीच प्रचिती देणारे एक उदाहरण घडले आहे. भोपाळमध्ये एका खाण मजूराचे नशिबाचे दरवाजे एका रात्रीत खुले झाले आहेत. पन्ना येथील हिरा खाणीत काम करणाऱ्या एका मजूराचे नशीब पालटत तो एका रात्रीत श्रीमंत झाला आहे. त्याला एक जबरदस्त हिरा सापडला आहे.

Bhopal Diamond Mine News
पन्ना येथील हिरा खाणीतील मजूर झाला मालमाल  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • पाच कॅरेटचा उच्च दर्जाचा हिरा सापडला
  • हिऱ्याची अंदाजे किंमत सुमारे 25 लाख आहे
  • 1 जूनपासून 5 छोटे-मोठे हिरे सापडले

Bhopal Diamond Mine News: भोपाळ : असे म्हणतात की जेव्हा योग जुळून येतात तेव्हा नशीबाचे दरवाजे एका झटक्यात खुले होतात आणि माणसाची परिस्थितीच बदलून जाते. भोपाळमध्ये याचीच प्रचिती देणारे एक उदाहरण घडले आहे. भोपाळमध्ये एका खाण मजूराचे नशिबाचे दरवाजे एका रात्रीत खुले झाले आहेत. पन्ना जिल्ह्यात आपले नशीब आजमवण्यासाठी हिरापूर येथील रहिवासी असलेले अरविंद कोंडार हे आले होते. त्याला 5 कॅरेटचा 70 सेंट्सचा उच्च दर्जाचा हिरा मिळाला आहे. पन्ना येथील हिऱ्याची खाण जगप्रसिद्ध आहे. पन्ना येथील खाणीचे अनेकांचे नशीब पालटले आहे. या खाणीने आता एका मजुराला करोडपती बनवले आहे. (Worker gets precious diamond from Panna Diamond Mine, becomes rich overnight)

अधिक वाचा : DGCA New Rules: ‘या’ लोकांना विमान प्रवास करता येणार नाही, DGCA चा निर्णय, विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी

तुमच्या माहितीसाठी हिरापूर टपरीयन येथील उथळ हिऱ्याच्या खाणीत हिरे विभागाकडून भाडेतत्त्वावर  परवानगणी घेत या मजुराने हिऱ्याची खाण टाकली होती. त्याला आज चमकणारा हिरा मिळाला आहे. मजुराने हा हिरा हिरा कार्यालयात जमा केला असून, या हिऱ्याची अंदाजे किंमत 25 लाख रुपये आहे.

हिऱ्यांचा लिलाव होणार

मिळालेल्या माहितीनुसार, हिरे विभागाचे हिरे पारखी अनुपम सिंह म्हणाले, "हा दर्जेदार हिरा आहे, आगामी लिलावात हा हिरा ठेवण्यात येणार आहे. 1 जूनपासून आजपर्यंत हिरे विभागात सुमारे 500 लहान-मोठे हिरे जमा करण्यात आले आहेत. " हे सर्व हिरे येत्या लिलावात समाविष्ट केले जातील. मात्र, हिरे मिळवणाऱ्या मजुरांचे दिवस त्यामुळे पालटणार आहेत. ते मालामाल होणार आहेत.

अधिक वाचा : Viagra Overdose : नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको वैतागून गेली माहेरी, करावी लागली शस्त्रक्रिया

गेल्या काही दिवसांपासून अनेकांना मिळाले दुर्मिळ हिरे 

तुम्हाला माहित आहे का, पूर्वी जस्मिन राणी नावाच्या एका महिलेलाही खाणीत एक हिरा सापडला होता. ज्याला पाहून महिलेच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 10 लाखांचा हिरा मिळाल्याने ही महिला रातोरात मालमाल झाली होती. त्याचवेळी जवळचाच एक रहिवासी प्रतापसिंग यादव यांनी आपल्या गरिबीला कंटाळून फेब्रुवारीमध्ये सरकारी हिऱ्याच्या खाणीसाठी खाणकामासाठी अर्ज केला होता. त्याला सरकारी खाण परिसरात 10x10 जमिनीची हिऱ्याची खाण खोदण्यासाठी भाडेपट्टा देण्यात आला होता. ज्यामध्ये त्याने रात्रंदिवस मेहनत केली आणि आता त्याचे नशीब रातोरात बदलले. गरीब मजूर आज करोडपती झाला आहे. त्याला खाणीतून हिरा मिळाला, हा हिरा 11.88 कॅरेटचा होता. ज्याची अंदाजे किंमत ३० लाखांच्या वर असल्याचे सांगण्यात आले. पन्ना जिल्ह्याने अनेकांचे नशीब बदलल्याच्यी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक गरिब लोक येथे नशीब आजमवण्यासाठी येत असतात.

अधिक वाचा : Paigambar Comment Issue : कुवैतच्या सुपरमार्केटमधून भारतीय उत्पादनं हटवली, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे पडसाद

पन्ना येथील हिऱ्याची खाण जगप्रसिद्ध असून तिथे आतापर्यत अनेक नामवंत हिरे सापडले आहेत. हिऱ्यांची किंमत त्याच्या कॅरेटवर आणि पैलूंवर ठरत असते. जितके कॅरेट जास्त तितका हिरा महागडा असतो. अर्थात हिऱ्याला पैलू पाडताना त्याचे वजन आणि आकार कमी होत जाते. मात्र जितके जास्त पैलू पाडलेले असतात तितकीच हिऱ्याची किंमत जास्त असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी