कोरोनामुळे १६ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात ५११ कोरोना रुग्ण

कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण १६ हजार ७१३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.

world death toll from coronavirus pandemic rose 16 thousand india 10 death registered
कोरोनामुळे १६ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात ५११ कोरोना रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण १६ हजार ७१३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.  यात चीन, इटली आणि इराणमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  भारतात कोरोनामुळे आज मुंबईतील एक आणि बिहारमधील एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या १० वर गेली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार अंटार्टिका सोडता इतर सर्व खंडातील १७९ देशात या व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे ३,८६,३३२ जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण  १६ हजार ७१३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुमारे १ लाख २ हजार ३३३ जण यातून बरे झाले आहेत. आजही जगभरात एकूण २ लाख ६७ हजार २८६ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यातील १२ हजार ०८६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

आतापर्यंत २,५५,२०० केसेस पॉझिटीव्ह त्यांची प्रकृती स्थीर आहे. तर १ लाख १९ हजार ०४६ केसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यात बरे झालेले रुग्ण आणि मृत पावलेल्या रुग्णांचा समावेश आहे. 

इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू 

चीनमधून या आजाराचा फैलाव झाला असला तरी आता इटलीमध्ये या व्हायरसने सर्वाधिक थैमान घातले आहे. इटलीमध्ये गेल्या २४ तास ६०१ जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ६ हजार ०७७ झाली आहे. तर चीनमध्ये आतापर्यंत अधिकृत मृतांचा आकडा ३२७७ आहे.  यानंतर तिसरा क्रमांक स्पेनचा लागतो. स्पेनमध्ये २३१६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

जगात सर्वाधिक मृत्यू संख्या असलेले देश 

 1. इटली - ६०७७

 2. चीन - ३२७७

 3. स्पेन - २३१६

 4. इराण - १९३४

 5. फ्रान्स - ८६०

 6. अमेरिका - ५८२

 7. ब्रिटन - ३३५

 8. नेदरलँड - २१३

 9. जर्मनी - १३०  

 10. दक्षिण कोरिया - १२०


भारताची सद्यस्थिती 

भारतात २३ राज्यात एकूण ५११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील सध्याच्या घडीला ४६४ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.   भारतात एकूण ३७ जण या आजारातून बरे झाले आहेत. तर आज सकाळी मुंबईत एक जण दगावल्याने भारतात मृतांची संख्या १० झाली आहे. 


जगाची आकडेवारीवर नजर 

 1. देश - १७९ 

 2. कोरोना बाधित -  ३,८६,३३२ 

 3. मृत्यू - १६ हजार ७१३

 4. बरे झालेले रुग्ण -  १,०२,३३३

 5. सध्या बाधित संख्या -  २,६७, २८६

 6. अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  १२ हजार ०८६


भारताची आकडेवारी 

 1. राज्य - २३ 

 2. कोरोना बाधित -  ५११

 3. मृत्यू - १०

 4. बरे झालेले रुग्ण -  ३७

 5. सध्या बाधित संख्या -  ४६४

 6. अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  ०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...