कोरोनामुळे २१ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात ६१३ कोरोना रुग्ण

कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण २१ हजार ५७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.  

world death toll from coronavirus pandemic rose 21 thousand india 13 death registered
कोरोनामुळे २१ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात ६१३ कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

 • इटलीमध्ये गेल्या २४ तास ६८३ जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ७ हजार ५०३ झाली आहे.
 • चीनला मागे टाकत स्पेन दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण दगावले आहेत.  स्पेनमध्ये ३६४७ जणांचा मृत्यू झाला आहे.
 • तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे.  चीनमध्ये आतापर्यंत अधिकृत मृतांचा आकडा ३२८७ आहे.  

मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १७९ देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण २१ हजार ५७७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.  यात चीन, इटली आणि इराणमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  भारतात कोरोनामुळे  ४ मृत्यू झाल्याने ही संख्या १३ वर गेली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार अंटार्टिका सोडता इतर सर्व खंडातील १७९ देशात या व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे ४,७९,९१५ जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण  २१ हजार ५७७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुमारे १ लाख १५ हजार ७९८ जण यातून बरे झाले आहेत. आजही जगभरात एकूण ३ लाख ४२ हजार ५४० रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यातील १४ हजार ९२९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

आतापर्यंत ३,२७,६१२ केसेस पॉझिटीव्ह त्यांची प्रकृती स्थीर आहे. तर १ लाख ३७ हजार ३७५ केसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यात बरे झालेले रुग्ण आणि मृत पावलेल्या रुग्णांचा समावेश आहे. 


इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू 

चीनमधून या आजाराचा फैलाव झाला असला तरी आता इटलीमध्ये या व्हायरसने सर्वाधिक थैमान घातले आहे. इटलीमध्ये गेल्या २४ तास ६८३ जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ७ हजार ५०३ झाली आहे. तर चीनला मागे टाकत स्पेन दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण दगावले आहेत.  स्पेनमध्ये ३६४७ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे.  चीनमध्ये आतापर्यंत अधिकृत मृतांचा आकडा ३२८७ आहे.  

जगात सर्वाधिक मृत्यू संख्या असलेले देश 

 1. इटली - ७५०३

 2. स्पेन - ३६४७

 3. चीन - ३२८७

 4. इराण - २२३४

 5. फ्रान्स - १३३१

 6. अमेरिका - १०३६

 7. ब्रिटन - ४४५

 8. नेदरलँड - ३५६

 9. जर्मनी - २२२  

 10. बेल्जियम - २२०     


भारताची सद्यस्थिती 

भारतात २३ राज्यात एकूण ६९३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  गेल्या २४ तासात ३६ नवे रुग्ण देशात आढळले आहेत. त्यातील सध्याच्या घडीला ६३५ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.   भारतात एकूण ४५ जण या आजारातून बरे झाले आहेत.  


जगाची आकडेवारीवर नजर 

देश - १७९ 
कोरोना बाधित - ४,७९,९१५ 
मृत्यू -२१ हजार ५७७
बरे झालेले रुग्ण -  १,१५,७९८
सध्या बाधित संख्या -  ३,४२, ५४०
अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  १४ हजार ९२८


भारताची आकडेवारी 

राज्य - २३ 
कोरोना बाधित -  ६९३
मृत्यू - १३
बरे झालेले रुग्ण -  ४५
सध्या बाधित संख्या -  ४३५
अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  ०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...