कोरोनामुळे ३८ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात १४२३ कोरोना रुग्ण

 कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १९९  देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण ३८ ,१०१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.

world death toll from coronavirus pandemic rose 38 thousand india 43 death registered
कोरोनामुळे ३८ हजारपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू, भारतात १४२३ कोरोना रुग्ण  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  कोरोनाने जगभरात थैमान घातले असून सुमारे १९९  देशांना याचा फटका बसला आहे. जगभरात या कोरोना व्हायरसमुळे एकूण ३८ ,१०१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वर्ल्ड ओ मीटरने दिली आहे.  यात चीन, इटली आणि इराणमधील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  भारतात कोरोनामुळे ४३ मृत्यू झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार अंटार्टिका सोडता इतर सर्व खंडातील १९९  देशात या व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे ७,८९,८०५ जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण ३८ ,१०१ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सुमारे १ लाख ६६ हजार ७३० जण यातून बरे झाले आहेत. आजही जगभरात एकूण ५, ८४,९७४ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यातील २९ हजार ६६१ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

आतापर्यंत ५,५५,३१३ केसेस पॉझिटीव्ह त्यांची प्रकृती स्थीर आहे. तर २ लाख ०४ हजार ८३१ केसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यात बरे झालेले रुग्ण आणि मृत पावलेल्या रुग्णांचा समावेश आहे. 


इटलीमध्ये सर्वाधिक मृत्यू  

चीनमधून या आजाराचा फैलाव झाला असला तरी आता इटलीमध्ये या व्हायरसने सर्वाधिक थैमान घातले आहे. इटलीमध्ये गेल्या २४ तास ८१२ जण दगावल्याने या देशात मृत्यूमुखी पडलेल्याची संख्या ११,५९१ झाली आहे. तर चीनला मागे टाकत स्पेन दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण दगावले आहेत.  स्पेनमध्ये ७७१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे.  चीनमध्ये आतापर्यंत अधिकृत मृतांचा आकडा ३३०५ आहे.  

जगात सर्वाधिक मृत्यू संख्या असलेले देश 

 1. इटली - ११,५९१

 2. स्पेन -  ७७१६ 

 3. चीन - ३३०५

 4. अमेरिका - ३१७३

 5. फ्रान्स - ३०२४

 6. इराण - २७५७

 7. ब्रिटन - १४०८

 8. नेदरलँड - ८६४

 9. बेल्जियम -७०५

 10. जर्मनी - ६५०


भारताची सद्यस्थिती 

भारतात २३ राज्यात एकूण १४२३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.  गेल्या २४ तासात २२७ नवे रुग्ण देशात आढळले आहेत. त्यातील सध्याच्या घडीला १२७५ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.   भारतात एकूण १०३ जण या आजारातून बरे झाले आहेत.  एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. 


जगाची आकडेवारीवर नजर 

 1. देश - १९९ 

 2. कोरोना बाधित - ७,८९,८०५ 

 3. मृत्यू -३८१०१

 4. बरे झालेले रुग्ण -  १ लाख ६६ हजार ७३०

 5. सध्या बाधित संख्या -  ५, ८४,९७४

 6. अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -   २९ हजार ६६१


भारताची आकडेवारी 

 1. राज्य - २३ 

 2. कोरोना बाधित -  १४२३

 3. मृत्यू - ४५

 4. बरे झालेले रुग्ण -  १०३

 5. सध्या बाधित संख्या -  १२७५    

 6. अती गंभीर परिस्थितीतील रुग्ण -  ०

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी