World Ozone Day 2020: ओझोन दिनानिमित्त Facebook आणि Whatsapp मेसेज

Whatsapp Quotes on World Ozone Day 2020: आज १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस आहे. त्यामुळे आपण आपल्या सर्व  मित्रांना आणि कुटुंबीयांना या दिनाच्यानिमित्त ओझोनचे महत्त्व पटवून देणारे मेसेज नक्की पाठवा. 

ozone main
ओझोन दिनानिमित्त Facebook आणि Whatsapp मेसेज  |  फोटो सौजन्य: Twitter

World Ozone Day 2020 whatsApp Marathi wishes and Messages: आज (१६ सप्टेंबर) रोजी जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) साजरा केला जात आहे. पृथ्वीसाठी (Earth) ओझोनचा थर हा अत्यंत आवश्यक आहे. मात्र, मानवनिर्मित प्रदूषणामुळे हा थर हळूहळू नाहीसा होऊ लागला आहे. ज्याचे गंभीर परिणाम येत्या काळात संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळेच या गोष्टीचं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण ओझोनचं नेमकं महत्त्व काय आहे हे आपल्या मित्र-मंडळींना पटवून देणं अत्यंत गरजेचं आहे. 

ओझोनचा थर हा एक प्रकारे पृथ्वीची संरक्षक भिंत आहे. कारण सूर्याचे जे अतिनील किरण बाहेर पडतात ती किरण थेट पृथ्वीवर न येऊ देण्याचे काम हे ओझोनचा थर करताता. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूंपासून बनलेला आहे.  शास्त्रीयदृष्ट्या ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळून येतो. त्यामुळे सूर्याचे अतिनील किरणं हे याच स्तरावर रोखले जातात.  दरम्यान, गेल्या काही वर्षापासून ओझोनच्या थराविषयी बरीच चिंता व्यक्त केली जात आहे. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रदूषण आणि विषारी वायूचं होणांर उत्सर्जन यामुळे ओझेनच्या थराला आता छिद्र पडू लागली आहेत. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणं ही थेट पृथ्वीवर येऊ लागली आहेत. ज्याचे गंभीर परिणाम देखील दिसू लागले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने १९९४ साली १६ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन असल्याचे घोषित केले होते. यानंतर १९९५ सालापासून १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.

दरम्यान, प्रदूषण कमी झाल्यास पृथ्वीचं आयुष्य आणखी वाढू शकतं हे वारंवार सांगण्यात येतं. त्यामुळे यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परिने प्रयत्न करणं गरजेचं आहे.  आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवसानिमित्त जनजागृती करु शकतो. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी काही खास मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश (World Ozone Day 2020 wishes and Quotes) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे मेसेज शेअर करु शकतात.  

जागतिक ओझोन दिनानिमित्त खास मेसेज! 

(फोटो सौजन्य: Twitter @Rupali Chakankar)

ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी संरक्षक थर आहे. यामुळेच पृथ्वीचे आयुष्यमान व तापमान स्थिर राहण्यास मदत होते. यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळूया, ओझोन वायूचा संरक्षण करूया.

जागतिक ओझोन थर संरक्षण दिन

(फोटो सौजन्य: Twitter @Nawab Malik)

ओझोन थर संरक्षणासाठी आपण अधिक काळजी घेऊया. ओझोन शिल्डचे रक्षण करून आपण एकत्र येऊन पृथ्वीवरील जीवनाच्या संरक्षणासाठी हात जोडू या! 

जागतिक ओझोन थर संरक्षण दिन

(फोटो सौजन्य: Twitter @Deeppak Pardiwala)

आज जागतिक ओझोन संरक्षण दिवस.
झाडांची संख्या वाढवली तरच
ओझोनचा थर वाढू शकतो.
प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करुन,
ओझोन संरक्षण दिवस साजरा करुया.. 

जागतिक ओझोन थर संरक्षण दिन

(फोटो सौजन्य: Twitter @Manisha Chaudhary) 

विश्व ओझोन दिवस 
या दिवसाचे औचित्य साधून सर्वानी ओझोन परतचे संरक्षण तथा पर्यावरण जतन करण्याचा संकल्प करूया!

जागतिक ओझोन थर संरक्षण दिन

(फोटो सौजन्य: Twitter @Mangesh Chavan)   

विश्व ओझोन दिवसानिमित्त संकल्प करुयात वसुंधरेच्या संर्वधनाचं! 

जागतिक ओझोन थर संरक्षण दिन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी